Raj Thackeray expresses concern over the possibility of riots during Ganeshotsav. sarkarnama
मुंबई

Raj Thackeray : गणेशोत्सवात दंगली घडवल्या जातील, राज ठाकरेंनी व्यक्त केली मोठी भीती; म्हणाले, 'पोरं जातील...'

Raj Thackeray MNS : धर्माच्या आणि जातीच्या गुंगीत लोकांना अडकवले जात आहे, त्यांचे लक्ष इतर समस्यांकडे जाऊ नये म्हणून हे केलं जात असल्याचा दावा राज ठाकरेंनी केला आहे.

Roshan More

Raj Thackeray News : '14 तारखेला गणपती येत आहेत. मला सर्वात जास्त भीती आहे की, गणपतीच्या दिवसात दंगली घडवल्या जातील, फक्त महाराष्ट्रात नाही म्हणत मी देशभरात. जेणेकरून तुम्ही त्याच्यात अडकले पाहिजे, बाकीच्या गोष्टींकडे तुमचं दुर्लक्ष झालं पाहिजे.', अशी भीती मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केली. ठाण्यात आयोजित महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.

पुढे ते म्हणाले की, 'एक दोन घटना घडल्या ही सुरुवात आहे. जो सुजाण हिंदू आहे, जो सुजाण मुस्लिम आहे, त्या दोघांनाही मला सांगायचे आहे की सतर्क राहा, आपल्या नावाने त्यांच्या नावाने कोणतरी घुसवतील हकनाक आपली पोरं जातील, त्यांची पोरं जातील. मुळ परिस्थितीकडे दुर्लक्ष करायला लावणे, हा त्यांचा हेतू आहे. कारण देशाची परिस्थिती आता अत्यंत वाईट आहे.

प्रत्येकाने आपआपला धर्म पाळावा, आपआपला परमेश्वर पाळावा, त्याची पुजा करावी, त्याचे स्तोम माजवले जात आहे. डीजे वाजवायचा नाय वाजवायचा यावर मुख्यमंत्री काय बोलले हे मला अजून कळलं नाही, असा टोला ही त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लगावला.

'धर्माची गुंगी आणायची, जातीयतेच्या गुंगीत आडकवायचं, बाकीच्या गोष्टी करायला हे सगळे जण मोकळे, आम्ही जंगल देतोय, जंगल तोडतोय, मुंबई, पुण्यातील जमीन अदानीला देतोय, जमीन कोण घेतोय याकडे लक्ष नाही, एसआयआरकडे लक्ष नाही, मग तुम्हाला या सगळ्या गोष्टीत गुंतवायचे सुरू आहे.', असे देखील ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT