Raj Thackeray : राज ठाकरेंचा मुलाच्या भूमिकेला पाठिंबा ; पीएम मोदींचा फोटो लावायला सूचवली दुसरी भिंत

Raj Thackeray on PM Modi’s Photo Placement : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापुरुषांच्या रांगेत मोंदीचा फोटो नकोच अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. अमित ठाकरेंच्या भूमिकेला त्यांनी एकप्रकारे पाठिंबा दिला.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन (Government Polytechnic) कॉलेजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हटवण्यावरून मोठा वाद झाला होता. महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोंच्या शेजारी लावल्यात आला होता.

अमित ठाकरे यांच्या आदेशानंतर एका मनसे कार्यकर्त्याने महापुरुषांच्या रांगेतून मोदींचा फोटा काढला होता. त्यानंतर अमित ठाकरे यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. अमित ठाकरेंच्या विरोधात भारतीय जनता पार्टीने आंदोलन देखील केलं. या सगळ्या घडामोडींमुळे अमित ठाकरेंचा पुणे दौरा चांगलाच चर्चेत आला.

आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले सुपुत्र अमित ठाकरे यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे. महापुरुषांच्या रांगेत पंतप्रधानांचा फोटो नको, अशी भूमिका राज ठाकरेंनी स्पष्ट केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा रविवारी, ६ सप्टेंबर रोजी ठाण्यात पार पडला. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित केलं.

राज ठाकरे म्हणाले, आमचा अमित पुण्याला गेला होता. त्यावेळी नरेंद्र मोदींच्या फोटोवरून वाद झाला. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले या सगळ्या मंडळींच्या रांगेत दुसरं कुणीही बसू शकत नाही. सरकारी कार्यालयांमध्ये पंतप्रधानांचा फोटो असायलाच पाहिजे का? तर नक्कीच असायला पाहिजे कारण ते पंतप्रधान आहेत. बाकी मतभेद शंभर असतील. पण तो दुसऱ्या भिंतीवर लावा, महापुरुषांच्या रांगेत नको.

Raj Thackeray
Raj Thackeray Meets Fadnavis : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड! ठाकरे थेट CM फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल

मला असं वाटतं की, सराकारी कार्यालये, शाळा किंवा इतर आस्थापने असतील त्यांनी या गोष्टी पाळल्या पाहिजे. कुणासोबत कुणाचे फोटो लागले पाहिजे, कोणत्या रांगेत कुणाचे फोटो हवे हे समजलं पाहिजे. कोर्ट, सरकारी अस्थापनामध्येही हे कळलं पाहिजे. त्यामुळे आत्ताच सुधारणा करुन घ्या असं राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray
Raj Thackeray : राज ठाकरेंनी खेळाडूला अडीच तास बसवून ठेवलं, शेवटी भेटलेही नाहीत; स्वतःच सांगितलं खरं काय?

राज ठाकरे पुढे म्हणाले, मी आज तुम्हाला बोलावलं कारण मला काही धोके दिसत आहेत. तुम्हाला वेगळ्या गोष्टींमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. केला जाणार..या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या म्हणून मी आजचा मेळावा आयोजित केला. या देशात सगळ्या ठिकाणी धर्माची झिंग आली आहे. धर्मांचा अभिमान असला पाहिजे मात्र झिंग नको...धर्माभिमानी असले पाहिजे. धर्मांध नव्हे अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडली. सोशल मीडियाच्या आणि अन्य माध्यमातून लोकांमध्ये राग निर्माण केला जात आहे. जेणेकरून इतर गोष्टीवरून दुर्लक्ष व्हावं, असेही राज ठाकरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com