Raj Thackeray, Narendra Modi .jpg Sarkarnam
मुंबई

Raj Thackeray Wrote Letter to Modi : वाजपेयींचे सर्व प्रयत्न वाया जातील..असं राज ठाकरे मोदींना का म्हणाले ?

सरकारनामा ब्युरो़

Mumbai News : गेल्या दोन महिन्यापासून मणिपूर पेटलंआहे. मणिपुरात मेइती आमि कुकी समाजातील काही जणांमध्ये झालेल्या वादामुळे हिंसाचार झाला. यात अद्यापपर्यंच शंभरहून अधिक जणांना मृत्यू झाला आहे. पाचशे पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत.

याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांना विनंती केली आहे. मणिपूर हिंसाचाराबाबत त्यांना पत्र लिहिले आहे. "ठोस पावलं उचला आणि मणिपूर पूर्ववत होईल, ते पाहा," अशी थेट भूमिका राज ठाकरे यांनी मांडली आहे. त्यांनी पीएम मोदी आणि अमित शहांना पत्र लिहले आहे.

मणिपूर शांत करून तिथल्या दुखावलेल्या लोकांच्या मनांवर फुंकर नाही घातला तर मणिपूरच नव्हे तर ईशान्य भारतात देशापासून विभक्त होण्याचा विचार जोर पकडेल आणि त्याला सरकार जबाबदार असेल, असे राज यांनी पत्रात म्हटलं आहे.

ईशान्य भारतातील मणिपूर हे राज्य शब्दशः असंतोषाने धुमसतंय. केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या एका मंत्र्याच्या घरावरच लोकांनी संतापाने हल्ला चढवला. इथपर्यंत परिस्थिती रसातळाला गेली आहे. हे सगळं गेले 2 महिने सुरु आहे आणि तरीही परिस्थिती आटोक्यात आणण्यात केंद्र सरकारला अपयश का येतंय हे कळत नाही, असे राज ठाकरे पत्रात म्हणतात.

राज ठाकरे म्हणतात, "मणिपूरमधील सध्याचं नेतृत्व परिस्थिती हाताळायला निष्प्रभ ठरत असेल तर भाजपाच्या शीर्ष नेतृत्वाने योग्य तो निर्णय घ्यावा,"

राज ठाकरे पत्रात म्हणतात..

  1. ईशान्य भारताकडे काँग्रेसने साफ दुर्लक्ष केलं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसला दूषण द्यायचे. पण आज त्यांच्याच कार्यकाळात ईशान्य भारतातील एक राज्य धुमसत असताना, त्यांनी मौन का बाळगलं आहे, हे माझ्यासाठी अनाकलनीय आहे.

  2. मध्यंतरी देशाचे गृहमंत्री अमित शाह हे चार दिवस मणिपूरमध्ये राहिले होते, तरीही परिस्थिती आटोक्यात का आली नाही? ह्या विषयावर काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चिंता व्यक्त केली होती. किमान त्यानंतर तरी पंतप्रधानांकडून ठोस कृती होईल, असं वाटलं होतं,

  3. ईशान्यकडील राज्यांना प्रवाहात आणण्यासाठी अटल बिहारी वाजपेयी यांनी खूप प्रयत्न केले होते. पण सध्या मणिपूरकडे ज्या पद्धतीने दुर्लक्ष होत आहे, ते पाहून वाजपेयींचे सर्व प्रयत्न वाया जातील, अशी भीती वाटते.

    (Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT