Raj Thackeray
Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

राज ठाकरेंनी मोदींकडे केल्या 'या' दोन मागण्या

सरकारनामा ब्यूरो

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या काही भूमिका पटल्या नाही, त्यामुळे बोललो होतो. त्यांनी जम्मू कश्मिर मधील ३७० कलम हटवल्यावर पहिल्यांदा अभिनंदन केले होते. माझ्या मोदींकडे दोन मागण्या आहेत. त्या दोन मागण्या पूर्ण झाल्या तर देशावर मोठे उपकार होतील. 'समान नागरी कायदा' आणि 'लोकसंख्येवर नियंत्रण' आणणारा कायदा आणा, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.

राज ठाकरे मनसेच्या ठाण्यातील सभेमध्ये बोलत होते. यावेळी ते म्हणाले, देशात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यानंतर ३० वर्षांनी नरेंद्र मोदी यांना बहूमत मिळाले आहे. त्यामुळे या दोन गोष्टी करा, असे आवाहन त्यांनी मोदी यांना केले. गुडीपाडव्याच्या सभेनंतर काही जणांच्या प्रतिक्रिया आल्या, असे ठाकरे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे एका नोटीशीने बदलले, अजित पवारांच्या घरी रेड पडते पण तुमच्या घरी पडत नाही, असा सवाल राज यांनी केला. त्याच बरोबर त्यांनी नरेंद्र मोदी आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीवरही निशाणा साधला. एक नेता आत गेला की दुसऱ्या नेत्याचे नाव सांगण्यासाठी पवारसाहेब मोदींची भेट घेतात, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. शिवसेनेचे (shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याबद्दल शरद पवार मोदींकडे बोलले असे त्यांनी सांगितले. मात्र, आत काय बोलले माहिती नाही. पवारसाहेब खुष झाले की भिती वाटायला लागते, असेही ते म्हणाले.

आज पवारसाहेब संजय राऊत यांच्यावर खुष आहेत. कधी टाकतील कळणार पण नाही. यामध्ये अनेक काँग्रेसवाले गेले आहेत. उशीरा समजते पवारसाहेब काय बोलले होते. राज ठाकरे यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका करताना 'जंत' पाटील असा टोला लगावला. माझे भाषण निट ऐका, उत्तर प्रदेशमध्ये विकास झाला असेल तर आनंद आहे, असे मी म्हणालो होतो. पाटील यांना काही सांगा, त्यांची मिमिक्री करत, सतत आर्चय झाले असा चेहरा असतो, अशा शब्दांत ठाकरे यांनी पाटील यांचा समाचार घेतला.

अनेक जण म्हणतात हा संपलेला पक्ष आहे, हा विझलेला पक्ष नाही, समोरच्यांना विझवणारा पक्ष आहे. राष्ट्रवादी हा निवडून येणाऱ्या लोकांची मोळी असलेला पक्ष आहे. त्याची दोरी फक्त पवारसाहेबांकडे आहे. ही माणस कोणत्याही पक्षात गेली तरी निवडून येतील, असेही ठाकरे म्हणाले. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावरही टीका केली. भुजबळ म्हणाले, माझ्यावर कारवाई झाली. मात्र, माझा मार्ग बदलला नाही. भुजबळसाहेब तुमचा सीए आणि जवळच्या माणसामुळे तुम्हाला आतमध्ये जावे लागले. भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यामुळे नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.

सगळे म्हणतात संपलेला पक्ष तरी बोलतात. यावेळी राज यांनी अजित पवार यांच्यावरही टीका केली. त्यांचा आवडता शब्द पठ्ठ्या आहे. त्यांना भोंगे आताच दिसले का असे ते म्हणाले. तुमच्या माहितीसाठी मी तीन व्हिडीओ आणलेत, भोंगे कशासाही पाहिजे हे मी २०१७ मध्येही बोललो होतो. त्यानंतर २०१८ ला सुद्धा बोललो होतो, त्याचे व्हिडीओ दावखत राज ठाकरे म्हणाले, हे अजित पवारांना माहित नसेल. त्यांना फक्त गुडीपाडव्याच्या सभेतील भाषणच ऐकायला आले असेल, असा टोला लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT