Eknath Shinde, Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray Meets Eknath Shinde: राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा धमाका ? राज ठाकरे अचानक मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला

Eknath Shinde And Raj Thackeray Meet: ठाकरे राज्यातील विविध मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा

सरकारनामा ब्यूरो

Raj Thackeray Visit CM Eknath Shinde : राज्यात आता वेगाने राजकीय समिकरणे बदलताना दिसत आहेत. शिवसेनेनंतर वर्षभरातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. त्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या सत्तेतील सहभागाने शिवसेनेतील आमदारांसह मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या अपक्ष आमदारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी (ता. ७) मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत. (Latest Political News)

राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांची भेट पूर्व नियोजित होती. राज्यातील विविध मुद्द्यांवर या भेटीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. मात्र राज्यातील वेगाने बदलणाऱ्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री शिंदे महाविकास आघाडीच्या सरकारमधून अजित पवार यांच्यावर टीका करूनच बाहेर पडले होते. त्यानंतर वर्षातच पुन्हा पवार यांच्यासोबत बसण्याची वेळ शिंदे यांच्यावर आली आहे.

राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात यापूर्वी सहा वेळा त्यानी राज्यातील विषयांसह वैयक्तिक भेटी झालेल्या आहेत. दरम्यान, अजित पवार यांच्या सरकारमधे येण्याने शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या काही राजकीय समिकरणांची चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनसे आणि भाजपच्या युतीची चर्चा झालेली आहे. तसेच ते शिंदेसोबत जाणार असल्याचेही बोलले जात होते. आता राष्ट्रवादी सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. तसेच भविष्यात सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात शपथ घेतली तर मला आश्चर्य वाटणार नाही, असेही त्यांनी स्पष्टच सांगितले होते. राष्ट्रवादीचा एक गट सत्तेत सहभागी होत असेल तर एकच विचारधारा असलेले सत्तेतील शिवसेना आणि मनसे का नाही, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. त्यामुळे आजच्या राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीला विशेष महत्व प्राप्त होत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT