Ramesh Baraskar on NCP Crisis : रमेश बारसकरांचा एल्गार; मोहोळचा पुढचा आमदार शरद पवार यांचाच !

Mohol NCP Politics : गेल्या आठवड्यात राज्यातील सत्ता संघर्षात दोन गट पडले.
Ramesh Baraskar on NCP Crisis :
Ramesh Baraskar on NCP Crisis :Sarkarnama
Published on
Updated on

Mohol NCP Politics राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार अंगीकारणारे आहेत. त्यांचे देशाच्या विकासात मोठे योगदान आहे. अभ्यासू नेता असा त्यांचा परिचय आहे. ओबीसी आरक्षण,शेती विषयक विविध अडचणी, मंडल आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्यास त्यांनी भाग पाडले. त्यासाठीच खा. पवार गटाबरोबर जाण्याचा निश्चय केला असून येत्या विधानसभेचा मोहोळचा आमदार हा शरद पवार यांचाच असेल, अशी स्पष्टोक्ती मोहोळचे राष्ट्रवादीचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी दिली. त्यामुळे राज्या बरोबरच आता मोहोळ राष्ट्रवादीतही फूट पडली आहे.

Ramesh Baraskar on NCP Crisis :
Fadnavis on Pankaja Munde: पंकजा मुंडे दोन महिने राजकीय ब्रेक घेणार? फडणवीस म्हणाले, पक्षातील वरिष्ठ नेते...

गेल्या आठवड्यात राज्यातील सत्ता संघर्षात दोन गट पडले. आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, माजी उपसभापती मानाजी माने यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाबरोबर जाण्याचा निश्चय केला, तर माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी खा पवार यांच्या गटा बरोबर जाण्याचा निर्णय घेतला, त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांची भूमिका स्पष्ट केली.

बारसकर पुढे म्हणाले, गेल्या 5 तारखेला खा पवार गटाच्या बैठकीसाठी मुंबई येथे गेल्यानंतर पवार यांनी जिल्हा व तालुक्याचा आढावा घेतला, कोण कुठे आहे याची खातरजमा केली. त्या विषयावर सुमारे 25 मिनिटे चर्चा झाली, जिल्ह्यातील अनेक नेत्यांना खा पवार यांनी बैठकीसाठी भ्रमणध्वनी वरून संपर्क केला मात्र, त्यांनी खा पवार गटाच्या बैठकीला येण्याचे टाळल्याचा गोप्यस्फोट बारसकर यांनी केला.

दरम्यान शरद पवार यांनी भाजपचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचेही त्यांच्या कामाबाबत कौतुक केल्याचे बारसकर यांनी सांगितले. आपण ज्योती क्रांती परिषदेची स्थापना केली त्यामुळेच मंत्री छगन भुजबळ पुन्हा राष्ट्रवादीत आले, तुम्ही काम करा मी तुमच्या पाठीशी खंबीर उभा आहे असा विश्वास दिला असल्याचे बारसकर यांनी सांगितले.

Ramesh Baraskar on NCP Crisis :
BJP On Rahul Gandhi: राहुल गांधींना बोलण्याचे प्रशिक्षण काँग्रेस देणार का ?; भाजपनं डिवचलं

माजी आमदार राजन पाटील व प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांचे राजकीय मनोमिलन होणार का? या बाबत बारसकरांना विचारले असता, सत्ता ही सर्वसामान्यांच्या हितासाठी वापरायची असते, मात्र माजी आमदार पाटील यांनी 30 वर्षे सत्ता भोगली पण तिचा दुरूपयोग केला. जो पर्यंत हे संपत नाही तोपर्यंत मनोमिलना बाबत प्रश्नचिन्ह असल्याचे त्यांनी सांगितले.

दोस्ताना संपुष्टात

दरम्यान प्रवक्ते उमेश पाटील,माजी उपसभापती मानाजी माने व तुम्ही माजी आमदार पाटील यांच्या विरोधात मोठे काम केले, मग तुमची व उमेश पाटील यांची दोस्ती राहणार का? याबाबत बारसकर यांना विचारले असता, आमचा राजकीय दोस्ताना संपुष्टात आला, पण आमची वैयक्तिक दोस्ती आहे. कोणी काय निर्णय घ्यावा हा ज्याच्या त्याचा प्रश्न असल्याचे बारसकर यांनी सांगितले.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com