Raj Thackeray Meet Devendra Fadnavis  Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray Meet Devendra Fadnavis: 'बेस्ट'मध्ये पराभव, 24 तासांत राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! बंद दाराआड चर्चा

Best Election Result Raj Thackeray Devendra Fadnavis : मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा देखील झाली.

Roshan More

Raj Thackeray News: बुधवारी बेस्ट पतपेढीचा निवडणुकीचा निकला जाहीर झाला. ठाकरे बंधू एकत्र येऊनही त्यांना पॅनलला या निवडणुकीत पराभव स्वीकाराला लागला. त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. या निवडणुकीच्या निकालाला 24 तास पूर्ण होत नाहीत तोच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज (गुरुवारी) वर्षावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराडआड चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.

राज ठाकरे नेमके कोणत्या कारणाने मुख्यमत्र्यांना भेटण्यासाठी आले आहेत याची निश्चित माहिती कळू शकली नाही. मात्र, बेस्टच्या पराभवानंतर लगेच राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या भेट घेतल्याने वेगवेगळ्या राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. राज ठाकरे यांच्यासोबत या भेटीत मनसे नेते बाळा नांदगावकर हे देखील उपस्थित होते. दरम्यान, मनसेच्या कोणत्याही नेत्याने या भेटीवर भाष्य करण्याचे टाळले आहे.

या भेटीविषयी बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत म्हणाले, दोन राजकीय नेते भेटत असतील तर त्यामध्ये आक्षेप घेण्यासारखे काही नाही. त्या नेत्यांमध्ये एक राज ठाकरे आहेत आणि एक राज्याचे मुख्यमंत्री आहेत. गणपती जवळ येत आहेत त्याचे निमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे गेले असतील. त्यामध्ये त्रास करून घेण्यासारखे काय आहे. या भेटी विषयी राज ठाकरेंचा स्वभाव पाहाते ते स्पष्ट आणि परखड बोलतील.

या भेटीचे वेगळे अर्थ काढू नका...

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, या भेटचे वेगळे अर्थ, अन्वयार्थ काढण्याची गरज नाही. बेस्टचा निकाल हा देखील भाजपच्या विरोधात लागला आणि तिसराच पॅनल विजय झाला. ठाकरेच नव्हे तर भाजप आणि देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात हा निकाल लागला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT