Mumbai : महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उध्दव ठाकरे यांनी २०१९ ला शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला संपूर्ण राज ठाकरे यांचे कुटुंबीय उपस्थित होते. शपथविधीनंतर उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे यांची भेट घेतली होती. तसेच यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले आणि उद्धव ठाकरेही भावूक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. पण शिवसेनेतील बंडखोरीनंतर आघाडी सरकार कोसळलं आणि उध्दव ठाकरें(Uddhav Thackeray)चं मुख्यमंत्रीपद गेलं, त्यावेळी राज ठाकरेंच्या मातोश्रींच्या मनाला काय वाटलं ते आता समोर आलं आहे.
राज ठाकरे(Raj Thackeray) आणि त्यांच्या आई कुंदाताई ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक रंजक किस्से, करामती, गुपितं उलगडली. तसेच उध्दव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदावर देखील भाष्य केलं. यावेळी त्या म्हणाल्या, उद्धव ज्यावेळी चार वर्षांचा होता. त्यावेळी माझं लग्न झालं होतं. तो माझा बहिणीचा मुलगा असं कधीच वाटलं नाही. उध्दवचं मुख्यमंत्रीपद जावं असं कधीच वाटलं नाही. ज्यावेळी मुख्यमंत्रीपद गेलं त्यावेळी अतिशय वाईट वाटलं अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
राज 'मातोश्री'वरच असायचा...
राज शाळेत असताना शुक्रवारी बाळासाहेब त्याला घ्यायला गाडी पाठवत होते. शनिवार आणि रविवार राज मातोश्रीवरच असायचा. शनिवारची शाळा तर त्याने कधी बघितलीच नाही. तेव्हा शनिवारी सकाळची शाळा असायची, बाळासाहेब म्हणायचे एवढ्या सकाळी कोणी शाळेत जातं का? मुळात तो लहान असताना बाळासाहेबांनी त्याचे अतोनात लाड केले असं त्यांनी सांगितला. राज ठाकरे यांच्या प्रगती पुस्तकावर बाळासाहेब सही करायचे असंही त्यांनी सांगितलं.
मी जर त्यावेळी बोर्डात पहिला आलो असतो, तर...
यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या शालेय जीवनातील रंजक प्रसंग उलगडला. ठाकरे म्हणाले, दहावीचा निकाल लागला तेव्हा बाळासाहेबांनी माझ्या आईला मी नापास झाल्याचं सांगितला. तेव्ही ती रडायला लागली. मी त्यावेळी अंघोळ करत होतो. तेव्हा जयदेव यांनी मला आवाज दिला. मी दरवाजा उघडताच त्यांनी माझ्याकडे रागाने बघतिलं आणि तुला वरती बोलावलं आहे, असा निरोप दिला. त्यावेळी प्रचंड घाबरलो होते. मात्र, वरती गेल्यावर बाळासाहेब माझ्याशी मस्करी करत होते, हे लक्षात आलं”, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
मी १०वी पास झालो म्हणून बाळासाहेबांनी घरात कलर टीव्ही आणला होता. मी जर त्यावेळी बोर्डात पहिला आलो असतो, तर बाळासाहेबांनी काय केलं असतं याचा विचार न केलेलाच बरा असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.