Mumbai News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मागील काही दिवसांत दोन वेळा दिल्लीवारी झाली. दिल्लीत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत मनसे आणि भाजपच्या संभाव्य युतीबाबत चर्चा झाल्याचे समजते. राज ठाकरे यांनी अमित शाहांच्या भेटीत मनसेला दोन ते तीन जागा देण्यात याव्यात, अशी मागणी केली. या भेटीतील अधिक तपशील समोर आले नसले तरी आता भाजप आणि मनसेची युती होणार, हे जवळपास आता निश्चित झाले आहे. (Latest Marathi News)
राज ठाकरे हे पुत्र अमित ठाकरेंना सोबत घेऊन अचानकपणे सोमवारी चार्टड विमानाने दिल्लीला रवाना झाले. या बातमीमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निरोपानंतर राज ठाकरे दिल्लीला गेले होते, असे सांगण्यात आले. मात्र, अमित शाह आणि राज ठाकरे यांच्या भेटीच्या हालचाल फार पूर्वीपासून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात लोकसभा आणि आगामी मुंबई पालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने मुंबईतच तीन वेळा बैठका घडून आल्या हाेत्या. यानंतर आता राज ठाकरे यांनी एकांतात आपल्याला भेटावे, अशी अमित शाहांनी इच्छा व्यक्त केली होती. अमित शाहांचा (Amit Shaha) हा निरोप फडणवीसांनी राज ठाकरे यांना सांगितला. त्यानुसार राज ठाकरे हे दिल्लीला शाहांच्या भेटीसाठी दाखल झाले होते. या भेटीत युतीबाबत चर्चा झाली.
राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शाह यांच्या भेटीत मनसेने जागा लढवण्याबाबत चर्चा झाली. मनसेने भाजपला दक्षिण मुंबई, नाशिक आणि शिर्डी या तीन लोकसभा जागांची मागणी केल्याचे समजते. मात्र, भाजपला जास्तीत जास्त जागा लढवणार आहे. यामुळे भाजपकडून फार तर एक जागा भाजप देऊ शकते. यामध्ये मुंबईतील एक किंवा शिर्डी या मतदारसंघाचा समावेश असू शकतो. मनसेकडून बाळा नांदगावकर हे लोकसभेचे उमेदवार असू शकतात.
(Edited By - Chetan Zadpe)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.