Raj Thackeray Alliance BJP: राज ठाकरे सोबत डीलसाठी फडणवीस का नाहीत? विनोद तावडेंसोबत अमित शाहांच्या भेटीसाठी रवाना

Raj Thackeray Politics:अमित शाह यांच्या भेटीमुळे मनसे-भाजप युती होण्याची शक्यता नाकारत येत नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पाडणारे देवेंद्र फडणवीस मात्र या डीलसाठी उपस्थित का नाहीत? असा प्रश्न विचारला जात आहे.
Raj Thackeray Alliance BJP
Raj Thackeray Alliance BJPSarkarnama
Published on
Updated on

Mumbai: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) हे सोमवारी रात्री अचानकपणे दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यानंतर मनसे-भाजप युतीच्या चर्चांना उधाण आले आहे. राज यांनी भाजपकडे लोकसभेसाठी (lok sabha election 2024) दोन जागांची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. या डीलसाठी राज ठाकरे हे त्यांचे चिंरजीव अमित ठाकरे यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत.

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासोबत एकाच गाडीतून ते शाह यांच्या निवासस्थानाकडे गेले आहेत. त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील राजकारणातील भाजपचे 'चाणक्य' म्हणून ओळख असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) का नाहीत, असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यात शिंदे-फडणवीस-पवार सरकार स्थापन झाल्यानंतर राज ठाकरेंच्या 'कृष्णकुंज' किंवा आता 'शिवतीर्थ' निवासस्थानी भाजप नेते देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, विनोद तावडे, नारायण राणे यांनीही राज ठाकरेंच्या घरी जाऊन भेटी घेतल्या आहेत. आता अमित शाह यांच्या भेटीमुळे मनसे-भाजप युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पाडणारे देवेंद्र फडणवीस मात्र या डीलसाठी उपस्थित का नाहीत? असा प्रश्न विचारला जात आहे.

Raj Thackeray Alliance BJP
Raksha Khadse News: रक्षा खडसेंच्या विरोधातील उमेदवार ठरला; संतोष चौधरी मैदानात

मनसे नेते, माजी आमदार बाळा नांदगावकर यांना मुंबई दक्षिण लोकसभेतून उमेदवारी मिळावी, यासाठी मनसे भाजपशी हातमिळवणी करणार असून, यासाठी आठवडाभरात राज ठाकरे दुसऱ्यांदा दिल्लीला गेले आहेत. "मला निरोप आला म्हणून मी दिल्लीला आलो," अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिल्लीला माध्यमांसमोर व्यक्त केली.

मुंबईमध्ये मनसेची ताकद आहे, त्यामुळे दक्षिण मुंबईतील जागा मनसेला सोडावी, अशी मागणी मनसेकडून करण्यात आल्याची माहिती आहे. त्यासोबत नाशिक किंवा शिर्डी या दोन मतदारसंघांपैकी एक भाजप मनसेला सोडण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबईतून राज ठाकरेंचे निष्ठावान मनसैनिक बाळा नांदगावकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. ते पाच वेळा आमदार राहिलेले आहेत.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com