Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत समीर भुजबळ यांनी काका छगन भुजबळ यांची साथ सोडली. त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदेंविरोधात नांदगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर छगन भुजबळांनी राजकारणातील पुतण्यांचा डीएनएच वेगळा आहे असं वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली होती.
त्यांनी 'शरद पवारांचा पुतण्या, अजितदादांचा पुतण्या, पूर्वी गोपीनाथ मुंडेंचा पुतण्या, बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे असे पुतणे आहेत ते काकाचं ऐकतातच असं नाही,असं विधान केलं होतं. त्या विधानावरुन आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भुजबळांना चिमटा काढला आहे.
राज ठाकरे बुधवारी (ता.30) एका मराठी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भूमिका करत भुजबळांनाही टोला लगावला. ते म्हणाले, 'खरं तर छगन भुजबळसुद्धा (Chhagan Bhujbal) एका पुतण्याबरोबरच पक्षातून बाहेर पडले. ते काकांबरोबर थांबले नाहीत. त्यांनी तरी किमान काकांची साथ सोडायला नको होतं असं राज ठाकरेंनी म्हटलं.
तसेच भुजबळांनी आता आमच्यासारख्या पुतण्यांना बरोबर घेऊन एक पक्ष काढावा अशी खोचक टिप्पणीही त्यांनी यावेळी केली. समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. ते म्हणाले, अतिशय प्रतिकुल परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये संघटन मजबूत केले. मात्र, नांदगावमध्ये भुजबळ कुटुंबाचे ऋणानुबंध आहेत. येथील कार्यकर्ते, पदाधिकारी माझी भेट घेऊन अन्याय होत असल्याचे सांगितले. त्यामुळे मी नांदगाव मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याचे समीर भुजबळ म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या कार्यक्रमात बोलताना लोकसभा निवडणुकीवेळीचा महायुतीबाबतचा मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीशी वाटाघाटीची प्राथमिक चर्चा करतानाच दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाची जागा मनसेने मागितली होती. या दोन्ही जागांवरुन शिंदे गटाचे उमेदवार निवडून येणार नाहीत,असे आम्ही तेव्हाच सांगितल्याचा दावा केला आहे. या दोन्ही जागा मनसेला लढवू द्या अशी मागणी केली होती.
आम्ही त्या जागा 100 टक्के जिंकल्या असत्या.पण शिवसेना शिंदे गटाकडून आमच्या उमेदवारांनी त्यांच्या धनुष्यबाण चिन्हावर लढावे,असे सांगण्यात आलं.त्यावर आपण त्यांना म्हणालो,अहो, आमच्या पक्षाची निशाणी कमावलेली आहे, ती ढापलेली नाही. आमची निशाणी ही निवडणुकीच्या इतक्या वर्षांच्या प्रवासात मिळाली आहे. लोकांच्या मतदानामुळे ही निशाणी आम्हाला मिळाली, ती कोर्टातून आलेली नाही,असा टोला त्यांना लगावला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.