Assembly election news: नाशिक मध्य आणि इगतपुरी या दोन मतदारसंघांमध्ये काँग्रेस नेत्यांना त्यांच्या चुका चांगल्याच भोवल्या आहेत. आज पक्ष नेत्यांनी बंडखोरांना केलेले आवाहन नाशिकच्या नेत्यांनी धुडकावून लावले आहे. बंडखोर उमेदवारीवर ठाम राहीले.
नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेसच्या इच्छुकांनी निवडणुकीची मोठी तयारी केली होती. या मतदारसंघात माजी नगरसेविका डॉ हेमलता पाटील, पक्षाचे प्रदेश सचिव राहुल दिवे आणि हनिफ बशीर आणि अन्य काही इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती.
उमेदवारीसाठी देखील या इच्छुकांनी मोठी ताकद पणाला लावली. मात्र काँग्रेसचे वरिष्ठ नेते आपनिल्या हक्काचा हा मतदारसंघ राखू शकले नाहीत. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला सोडण्यात आला.
या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून माजी आमदार वसंत गीते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माजी आमदार गीते यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करीत आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी अतिशय जोरदार प्रचार देखील सुरू केला आहे.
विविध नेते त्यांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. मात्र काँग्रेस बंडखोरांची समजूत घालण्यात त्यांना अद्याप यश आलेले नाही. बंडखोर डॉ हेमलता पाटील यांनी अपक्ष उमेदवारी करीत प्रचार देखील सुरू केला आहे. ही बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान स्थानिक नेत्यांपुढे आहे.
अशीच स्थिती इगतपुरी मतदारसंघात झाली आहे. वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या गटबाजीचा फटका या पक्षातील स्थानिक नेत्यांना बसला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा अन्य नेत्यांशी योग्य समन्वय नसल्अयाने पक्षाला पटका बसल्याचा आरोप स्थानिक नेत्यांनी केला आहे.
इगतपुरी मतदारसंघात लकी जाधव या नवख्या उमेदवाराला उमेदवारी देण्यात आली आहे. या उमेदवाराला मतदारसंघातून प्रचंड विरोध झाला. या उमेदवारीच्या निषेधार्थ ६५ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. श्री जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकही पदाधिकारी सोबत जाण्यास तयार झाला नाही.
लकी जाधव या उमेदवाराची प्रचंड कोंडी झाली आहे. हा उमेदवार प्रचार कसा करणार? अशी परिस्थिती आहे. या मतदारसंघातून माजी आमदार निर्मला गावित या प्रबळ उमेदवार होत्या. त्या शिवसेनेच्या उपनेत्या होत्या. काँग्रेसच्या उमेदवारीसाठी त्यांनी प्रयत्न केले. मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार गावित यांच्या उमेदवारीचा एकमुखी ठराव आणि शिफारस केली होती. त्यानंतर देखील नेत्यांनी वेगळ्याच उमेदवाराला उमेदवारी दिली.
आज मुंबईत पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला आणि प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी बंडखोरांना निवडणुकीतून माघार घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र त्याला किती प्रतिसाद मिळेल याविषयी सगळेच साशंक आहेत.
नाशिक आणि इगतपुरी मतदारसंघातून मात्र सर्व बंडखोरांनी पक्षनेत्यांचे हे आदेश धुडकावून लावले आहेत. माजी नगरसेविका हेमलता पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी करणार आहे. माघार घेण्याचा प्रश्नच नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे आता काँग्रेस नेत्यांचे आदेशही स्थानिक पदाधिकारी धुडकवून लावत असल्याचे चित्र आहे.
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.