Raj Thackeray sarkarnama
मुंबई

राज ठाकरेंची कार्यकर्त्यांना तंबी; मी योग्यवेळेस भूमिका मांडेन

शिवसेनेचे (Shivsena) चिन्ह गोठवले गेल्यानंतर मनसेच्या प्रवक्त्यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला.

सरकारनामा ब्यूरो

Raj Thackeray News : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे (Shivsena) नाव आणि चिन्ही गोठवले आहे. त्यावरुन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट समोरा-समोर आले आहेत. शिवसेनेचे चिन्ह गोठवले गेल्यानंतर मनसेच्या प्रवक्त्यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कार्यकर्त्यांना प्रतिक्रिया व्यक्त करण्यास मनाई केली आहे.

या संदर्भात राज ठाकरे यांनी ट्वीट केले आहे. ठाकरे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, ''सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकांनी, कुठल्याही माध्यमांवर अथवा सोशल मीडियावर बोलू किंवा लिहू नये. मी योग्य वेळेस पक्षाची ह्या सगळ्यावर भूमिका मांडेन'' असे ठाकरे म्हणाले आहेत.

शिवसेनेचे चिन्ह गोठवल्यानंतर शिवसैनिकांकडून तिव्र प्रतिक्रया उमटत आहेत. त्यातच मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्यास वाद होण्याची शक्यता निर्माण होईल, या उद्देशाने राज यांनी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच या वादावर आपण स्वत: योग्य वेळी भूमिका मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, हिंगोलीत संतप्त शिवसैनिकांनी एकत्र येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुतळा जाळला. तसेच, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या जिंदाबादच्या घोषणा दिल्या. निम का पत्ता कडवा है...एकनाथ शिंदे ... है अशा निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत ४० आमदार हे दोन तोंडी आहेत. जिकडं पैसा आहे, तिकडे हे चालले आहेत, अशी टीकाही शिवसैनिकांनी पुतळा जाळताना केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT