मनसेनं बॅनरबाजी करून शिवसेना आणि शिंदे गटाला डिवचलं...

MNS : शिंदे गटाकडून मनसेची निशाणी असलेले इंजिन उलटे करत उथळ प्रसिद्धीचा सोपा धंदा असे टॅग लाईन देत डोंबिवलीत बॅनर झळकावले होते.
MNS, Shivsena Latest News
MNS, Shivsena Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

डोंबिवली : निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या नावासह निवडणूक चिन्हही गोठवलं आहे. हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. यावरुन राज्यभरात चर्चा सुरु असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) डोंबिवली शहरात केलेली बॅनरबाजी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आमची निशाणी रेल्वे इंजिन, अशा आशयाचे बॅनर शहराज झळकत असून यावरुन मनसेने ठाकरे व शिंदे गटाला डिवचले आहे.

दरम्यान, शिवसेना (Shivsena) नावासह चिन्हासाठी शिंदे व ठाकरे गटात वाद आहे. अंधेरी पोटनिवडणूकीसाठी तात्पुरते का असेना हे चिन्ह गोठवले असल्याने मनसेने आमची निशाणी रेल्वे इंजिन, असे सांगत लोकांच्या मनात आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.(MNS, Shivsena Latest News)

MNS, Shivsena Latest News
शरद पवारांमुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले; त्यांच्यावर आरोप करणे म्हणजे मुर्खपणा...

कल्याण डोंबिवलीतील विकासकामांवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सातत्याने सत्ताधारी शिवसेनेला धारेवर धरण्यात येत आहे. राज्यात भाजपा आणि शिंदे गटाचे सरकार आले असताना रस्त्यांच्या विकास निधीवरुन मनसेने कामाच्या मुहूर्तासाठी ज्योतिषी नेमणे आहे, असे सांगत शिंदे गटाला डिवचले होते. त्यानंतर शिंदे गटाकडून मनसेची निशाणी असलेले इंजिन उलटे करत उथळ प्रसिद्धीचा सोपा धंदा असे टॅग लाईन देत डोंबिवलीत बॅनर झळकावले होते.

पक्षाच्या निशाणीला शिंदे गटाने लक्ष केल्याने मनसैनिकांच्या मनात खदखद होती. अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पक्षाच्या नावाचा वापर तसेच चिन्हाचा वापर दोन्ही गटास करता येणार नाही, असा निर्णय देत पक्षाचे चिन्ह गोठविले आहेत. यामुळे चिन्हाचा विषय चांगलाच चर्चिला जात आहे. हिच संधी साधून मनसेने मनातील खदखद बाहेर काढली आहे. डोंबिवली शहरात आमची निशाणी, असे म्हणत रेल्वे इंजिन या चिन्हाचे बॅनर शहरभर लावत एक प्रकारे ठाकरे व शिंदे गटाला डिवचलं आहे.

MNS, Shivsena Latest News
उलट्या काळजांच्या लोकांनी कट्यार काळजात घुसवली...उद्धव ठाकरे भावूक

याबाबत डोंबिवली शहराचे मनसेचे शहर सचिव संदीप म्हात्रे यांना विचारलं असता ते म्हणाले, आम्ही कोणाला डिवचण्यासाठी हे बॅनर लावले नाहीत, असे सांगत यावर अधिक बोलणे टाळले.

दरम्यान, मनसे कार्यकर्त्यांना चिन्हावर काहीही बोलण्यास अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनाई केली असल्याचे समजते. मनाई असली तरी बॅनरमधून शिंदे व ठाकरे गटापर्यंत हा संदेश या बॅनरच्या माध्यमातून पोहोचविण्याचे काम मनसे कार्यकर्त्यांनी केले आहे, अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com