Raju Patil, Raj Thackeray  Sarkarnama
मुंबई

Raju Patil statement : राजू पाटलांनी विधानपरिषद निवडणुकीत कुणाला केले होते मतदान? पहिल्यांदाच आले समोर, राज ठाकरेंवरील टीकेनंतर झाला खुलासा...

MNS vote, Parinay Fuke statement : राजकारणात मतभेद असू शकतात, टीकाही होऊ शकते; पण ज्यांनी आपल्याला साथ दिली, त्यांचा इतिहास विसरू नये, एवढेच सांगणे असल्याचे राजू पाटील यांनी पोस्टच्या अखेरीस म्हटले आहे.

Rajanand More

Raj Thackeray security : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून मागील काही महिन्यांत सातत्याने राज्य व केंद्र सरकारच्या कारभारावर टीका केली जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे वाभाडेही त्यांनी काढले आहेत. भाजप नेत्यांकडूनही या टीकेला प्रत्युत्तर दिले जात आहे. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार परिणय फुके यांनीही गुरूवारी राज ठाकरेंच्या सुरक्षेवरच भाष्य केले.

राज ठाकरे यांच्याकडे कुठलेही पद नसताना देवेंद्र फडणवीस यांना त्यांना मोठी पोलीस सुरक्षा दिली आहे. त्यांची ही सुरक्षा काढली तर राज ठाकरे घराबाहेरही निघणार नाहीत, असे विधान फुके यांनी केले आहेत. त्यावर मनसे नेत्यांकडून पलटवार करण्यात आला आहे. पक्षाचे माजी आमदार राजू पाटील यांनी फुके यांच्या विधानाचा समाचार घेतला.

राजू पाटील यांनी सोशल मीडियात पोस्ट करत 'राजसाहेबांवर बोलण्यापूर्वी एकदा आपल्या राजकीय प्रवासात ज्यांनी आपल्याला साथ दिली, त्यांची आठवण ठेवा,' असे फुके यांना उद्देशून म्हटले आहे. आज आपण विधान परिषदेचे आमदार म्हणून राजसाहेबांवर बोलत आहात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आमदार असताना आपल्याला माझे मत दिले होते, असे पाटील म्हणाले आहेत.

आज आपल्याला विधान परिषदेचे आमदार म्हणून राजसाहेबांवर अशा प्रकारे बोलण्याची अर्थात बाता मारण्याची संधी मिळाली असती का, याचाही विचार करा. राजसाहेबांनी आम्हाला एक महत्त्वाची शिकवण दिली आहे की आपण कोणावर केलेले उपकार कधीही बोलून दाखवायचे नसतात. पण आज नाईलाजाने आपण मा.राजसाहेबांवर केलेल्या विधानांमुळे मला ही गोष्ट जाहीरपणे सांगावी लागत आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

राजकारणात मतभेद असू शकतात, टीकाही होऊ शकते; पण ज्यांनी आपल्याला साथ दिली, त्यांचा इतिहास विसरू नये, एवढेच सांगणे असल्याचे पाटील यांनी पोस्टच्या अखेरीस म्हटले आहे. दरम्यान, फुके हे जुलै २०२४ मध्ये राज्यात झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत निवडून आले आहेत. त्यावेळी मनसेचे एकमेव मत कुणाच्या पारड्यात पडणार, याबाबत जोरदार चर्चा होती. त्याचा खुलासा पाटील यांनीच गुरूवारी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT