

NCP SP latest news : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून प्रदेश प्रवक्ते नितेश कराळे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर सहा वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत कराळे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ही बंडखोरीच त्यांना भोवली आहे.
नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी काँग्रेसचे अभिजीत वंजारी हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही त्यांना पाठिंबा दिला आहे. नितेश कराळे हे या निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र, काँग्रेसच्या वाट्याला हा मतदारसंघ गेल्याने त्यांनी बंडखोरी केली. ते या मतदारसंघात जोरदार प्रचारही करत आहेत.
नितेश कराळे यांच्यावर पक्षाने मतदानाच्या काही तास आधी कारवाई केली आहे. त्यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यावर पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. कराळे यांच्या उमेदवारीमुळे आघाडीमध्ये बिघाडी झाल्याची चर्चा होती.
वंजारी हे नागपूर पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. मागील निवडणुकीत ते या मतदारसंघातून विजयी झाले होते. काँग्रेसने यावेळीही त्यांच्यावरच विश्वास दाखविला आहे. तर त्यांच्याविरोधात भाजपचे सुधाकर कोहळे हे रिंगणात आहेत.
कराळे यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीच्या मतांची विभागणी होण्याची भीती वंजारी यांना होती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने कराळे यांच्यावर कारवाई केल्याने वंजारी यांना निवडणुकीच्या काही तास आधी दिलासा मिळाला आहे. कराळे हे राष्ट्रवादीचे प्रवेश प्रवक्ते होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.