MNS Chief Raj Thackeray
MNS Chief Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

MNS : राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित

सरकारनामा ब्युरो

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्या अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावरुन राजकारण चांगलंच तापायला लागले होते. राज ठाकरे येत्या पाच जूनला अयोद्धेला जाणार होते. (Raj Thackeray latest news)

काही कारणामुळे राज ठाकरे यांचा हा दौरा स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी याबाबत टि्वट करून माहिती दिली आहे. मात्र, पुण्यातील सभा होणार असून मनसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राज यांनी ट्वीटमध्ये केले आहे. प्रकृतीच्या कारणामुळे 5 जूनला होणारा अयोध्या दौरा (Ayodhya Tour) पुढे ढकलला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरू होती.

राज ठाकरे यांच्या दौऱ्याला उत्तर प्रदेशचे भाजप खासदार ब्रजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांनी जोरदार विरोध केला होता. राज ठाकरे यांनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी त्यानंतरच अयोध्येत पाय ठेवावा अशी भूमिका बृजभूषण सिंह यांनी घेतली होती.

मनसेनेही आक्रमक पवित्रा घेतला होता. राज ठाकरे यांच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशारा मनसेने दिला होता.यासंदर्भातले बॅनर मुंबईतल्या लालबाग परिसरात लावण्यात आले होते. या बॅनरमुळे आता मनसेही उत्तर देण्यासाठी सज्ज असल्याचं पाहिला मिळत होते.

हा दौरा स्थगित झाल्याने वादावर तात्पुरता तोडगा पडला आहे. तब्येतीच्या कारणामुळे राज ठाकरे यांचा हा दौरा स्थगित केल्याचे समजते. डॅाक्टरांच्या सल्लानंतर या दौऱ्याबाबत लवकरच मनसेकडून माहिती देण्यात येणार आहे.

राज ठाकरे हे ५ जून रोजी अयोध्येत राजकारण करण्यासाठी येत नसून प्रभू रामाच्या दर्शनासाठी येत आहेत. रामनगरी अयोध्येत आपण स्वतः त्यांचे स्वागत करू. त्यांना विरोध करणारे भाजप खासदार ब्रजभूषण शरण सिंह ना आवरावे, अशा मागणीचे पत्र महाकाल मानव सेवा संस्थेच्या साध्वी कंचन गिरी (Sadhvi Kanchan Giri) व अन्य साधू महंतांनी यांनी पंतप्रधान कार्यालयाला पाठविले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT