Raj Thackeray travels by Mumbai local train from Dadar to Churchgate to join the opposition protest, accompanied by MNS leaders Anil Shidore and Nitin Sardesai. Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray : राज ठाकरेंनी दादरमधून 10.41 ची लोकल पकडली, तुफान गर्दीतही मिळवली विंडो सीट; इतर नेत्यांचं काय झालं?

Raj Thackeray local train travelling : मतदारयादीतील घोळ आणि मतचोरीविरोधातील मोर्चात सहभागी होण्यासाठी राज ठाकरे यांनी दादरवरून चर्चगेटपर्यंत लोकलने प्रवास केला. अनिल शिदोरे आणि नितीन सरदेसाईही सोबत होते

Hrishikesh Nalagune

Raj Thackeray news : मतदारयादीतील कथित घोळ आणि कथित मतचोरीविरोधात विरोधी पक्षांच्या वतीने शनिवारी (1 नोव्हेंबर) सत्याचा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिका असा या मोर्चाचा मार्ग असणार आहे. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, माजी मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, मनसे प्रमुख राज ठाकरे सहभागी होणार आहेत.

तत्पूर्वी या मोर्चात सहभागी होण्यासाठी जाताना राज ठाकरे यांचा प्रवास सर्वात चर्चेचा ठरला आहे. मुंबईतील ट्राफिकला वैतागून राज ठाकरे यांनी चर्चगेटला लोकलने जाणे पसंत केले. त्यांच्यासह अनिल शिदोरे, नितीन सरदेसाई यांच्यासह अन्य मनसे नेतेही सोबत होते. या सर्व नेत्यांनी दादरवरून त्यांनी 10 वाजून 41 मिनिटांची लोकल पकडली आणि फर्स्ट क्लासमधून प्रवास केला.

राज ठाकरेंना मिळाली विंडो सीट :

दादरसारख्या तुफान गर्दीच्या स्टेशनवरून, सकाळी 9 ते 11 या गर्दीच्या वेळेत प्रवास करूनही राज ठाकरे यांना दादर स्टेशनवरून विंडो सीट मिळाली. शिवाय मनसेच्या इतर नेत्यांनाही राज ठाकरे यांच्याच शेजारी आणि समोरील सीटवर बसायला जागा मिळाली. राज ठाकरेंचे सुरक्षा रक्षक आणि सोबतच्या पोलिसांना मात्र उभे रहावे लागले.

सकाळी 9 ते 11 या कार्यालयीन वेळेत हार्बर, सेंट्रल आणि वेस्टर्न लाईन्सवर तुफान गर्दी असते. अनेकांना ट्रेनमध्ये चढायलाही मिळत नाही. त्यामुळे या वेळेत फर्स्ट क्लास डब्याची अवस्थाही सेकंड क्लासच्या डब्या प्रमाणेच असते. त्यात राज ठाकरे यांनी अनेक वर्षांनंतर लोकलने प्रवास केला. त्यानंतर देखील राज ठाकरेंना बसण्यासाठी विंडो सीट मिळाली आणि याहून विशेष गोष्ट म्हणजे राज ठाकरे प्रवास करत असलेली लोकल 11 वाजून 11 मिनिटांनी म्हणजे अगदी वेळेत चर्चगेटला पोहोचली, याचे सर्वांनाच आप्रुप वाटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT