Raj Thackeray and Uddhav Thackeray  Sarkarnama
मुंबई

Thackeray March : विद्यार्थ्यांसाठी ठाकरे बंधू एकत्र; मुंबईतून भव्य मोर्चा निघणार, सरकारला इशारा

Raj Thackeray Uddhav Thackeray : विद्यार्थ्यांच्या पाठींब्यासाठी राज ठाकरे-उद्धव ठाकरे रविवारी मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाची घोषणा संयुक्त पत्रकार परिषद घेत ठाकरे बंधूंनी केली.

Roshan More

Students March : विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र आले आहेत. ते रविवारी शिवाजीपार्कवरून भव्य मोर्चा काढणार आहेत. ठाकरे बंधुंनी एकत्र पत्रकार परिषद घेत या मोर्चाची घोषणा केली.

राज ठाकरे म्हणाले, आम्ही विद्यार्थ्यांना सोबत घेऊन रविवारी (ता.26) मोर्चा काढणार आहोत. तर, उद्धव ठाकरेंनी दिल्लीचे आंदोलन मोडून काढण्याचा पोलिसांच्या माध्यमातून जो प्रयत्न झाला त्यावर टीका केली.

ते म्हणाले, भाजपने पोलिसांच्या वेशात गुंड आणले. सिव्हिल ड्रेसमधील गुंडांच्या हातात काठ्या दिल्या, आंदोलन मोडण्यासाठी भाजपने पाकिस्तानमधून गुंड आणले का?

राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, हे आंदोलन सरकारच्या अंगलट आलय, त्यामुळे त्यांच्याकडून सारवासारव सुरू आहे. घराघरात हे आंदोलन पोहोचलं आहे. त्यामुळे प्रश्न सोडवायचा की चिघळवायचा हे सरकारने ठरवावं.

आम्ही 26 जुलैला जो मोर्चा काढणार आहोत तो शांततेत असेल. मात्र मोर्चा शांततेत असेल मात्र, दिल्ली सारखं कोणी घुसण्याचा प्रयत्न केला तर फटकावून काढू, दिल्ली सारखा प्रयत्न येथे झाला तर आमची लोकं सोडणार नाहीत, असा इशारा देखील राज ठाकरेंनी दिला.

उद्धव ठाकरे म्हणाले, विद्यार्थ्यांनी सरकारला निवडून दिलं आहे. मात्र, आता विद्यार्थ्यांना हे सरकार नकोसे झाले आहे. पंतप्रधानांनी ट्विट केलं पण त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधायला हवा. कमीपणा बाळगण्याची गरज नव्हती, आपलीच मुलं आहेत

पुढ बोलताना ते म्हणाले, पंतप्रधानांनी पहिल्याच दिवशी या मुलांशी बोलायला हवे होते. लोकांना राग व्यक्त करायचा आहे. इतक्या दिवसाचा राग उफाळून आला आहे.

हा उद्दामपणा आहे...

राज ठाकरे म्हणाले की, पदावर बसलेल्या व्यक्तीने झालेल्या चुकांची जबाबदारी घ्यायची असते आणि जर भारतीय जनता पक्षाने विरोधात असताना तत्कालीन सरकारच्या मंत्र्यांचे राजीनामे मागितले होते मग आता भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला हवा. आम्ही कोणाशी बोलणार नाही, कुठलंही आंदोलन झालं तर आंदोलनकर्त्यांशी बोलणार नाही, हा सत्तेचा उद्दामपणा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT