Raj Thackeray : लोकपाल विधेयकाच्या आंदोलनातून मिळवलेली सत्ता विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून जाणार, हे निश्चित!

Raj Thackeray on Lokpal agitation and students: सीजेपी संसद मोर्चातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची केंद्रावर झोड; विद्यार्थ्यांच्या संघर्षाला सलाम करत पंतपंधान नरेंद्र मोदींवर टीका.
Raj Thackeray Lokpal Bill movement remarks
Raj Thackeray Lokpal Bill movement remarksSarkarnama
Published on
Updated on

Raj Thackeray on Student Protest: कॉक्रोच जनता पार्टीच्या संसद मोर्चादरम्यान झालेल्या हिंसाचारावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'लेम डक' प्रेसिडेंट असा पंतप्रधान मोदींचा उल्लेख करत ठाकरेंनी लोकपाल विधेयकाच्या आंदोलनातून मिळवलेली सत्ता विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून जाणार, हे निश्चित, असेही म्हटले आहे.

राज ठाकरे यांनी सोशल मीडियात पोस्ट करत सीजेपीच्या आंदोलनावरून सरकारला घेरलं आहे. काल पंतप्रधान हा मुद्दा सोडून सगळं बोलले. इंग्रजीत एक शब्दप्रयोग आहे, 'लेम डक' प्रेसिडेंट.

म्हणजे ज्या पंतप्रधानांचा किंवा राष्ट्राध्यक्षांचा शेवटचा कार्यकाळ सुरु असतो ते पंतप्रधान हे निवांत असतात, जगभर दौरे करतात, आणि त्यांचा प्रभाव कमी झालेला असतो आणि त्यांचा उत्तराधिकारीच सगळा कारभार हाकत असतो. सध्या मोदींची अवस्था अशी झाली आहे असं दिसतंय, असे ठाकरेंनी म्हटले आहे.

'उत्तराधिकारी'वरून डिवचले

मोदींच्या मनात या सगळ्याबद्दल समजा कृती करण्याची इच्छा जरी असली तरी उत्तराधिकारी होण्याच्या स्पर्धेत असलेली शक्ती त्यांना दुर्लक्ष करायला भाग पाडत असावी, असे म्हणत राज ठाकरेंनी त्यांना डिवचले आहे.

अर्थात मोदी पंतप्रधान असताना विद्यार्थ्यांचं आंदोलन निर्दयीपणे चिरडलं गेलं हे इतिहास लक्षात ठेवेलच. तशीच प्रतिमा व्हावी अशी कोणाची इच्छा असेल आणि मोदी त्याला बळी पडणार असतील तर मग प्रश्नच संपला, असेही त्यांनी म्हटले आहे.

Raj Thackeray Lokpal Bill movement remarks
Shiv Sena UBT : ओमराजेंसह 6 खासदारांना विलीनीकरण भोवणार? अधिवेशन सुरू असतानाच ठाकरेंची 'सुप्रीम' चाल...

सर्वांच्याच दरवाजावर टकटक

लोकपाल विधेयकाच्या आंदोलनातून मिळवलेली सत्ता विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून जायला लागणार हे निश्चित, असे भाकित राज ठाकरेंनी वर्तविले आहे. २०१८/१९ पासून मी जनतेला सांगत होतो की मी काय या सरकार बद्दल बोलतोय हे तुम्हाला आज नाही कळणार पण ज्या दिवशी तुमच्या दरवाजावर अन्यायाची टकटक होईल तेव्हा मी काय सांगत होतो हे समजेल. आज सर्वांच्याच दरवाजावर टकटक सुरू झाली असल्याचे राज ठाकरेंनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

Raj Thackeray Lokpal Bill movement remarks
CJP Delhi protest : दिल्लीतील हिंसाचार खटकला; मोदी सरकारमधील मंत्रीही 'सरकारी' भूमिकेविरोधात पहिल्यांदाच थेट बोलले...

विद्यार्थ्यांच्या धैर्याला सलाम

विद्यार्थ्यांनी जो संघर्ष उभा केला आहे त्याचं मनापासून कौतुक. शेजारच्या श्रीलंकेत २०२२ ला विद्यार्थ्यांनी असंच आंदोलन उभं केलं होतं. २०११ चं अरब स्प्रिंग, नेपाळ मध्ये देखील तेच. ही सगळी अगदी ताजी उदाहरण आहेत.

जय प्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीचं आंदोलन उभं केलं त्याचा पाया हा पण विद्यार्थ्यांच्या असंतोष होता. आज आपल्या देशातील विद्यार्थ्यांच्या या धैर्याला पण सलाम, असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com