Raj Thackeray On Badlapur Case Sarkarnama
मुंबई

MNS On Badlapur Case : "त्या मुलींना आणि त्यांच्या घरच्यांना…"; बदलापूर प्रकरणावरून राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन

शर्मिला वाळुंज

Badlapur Rape Case : बदलापूर प्रकरणाचे पडसाद राज्यासह देशाच्या राजकीय वर्तुळातही उमटत आहेत. राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या प्रकरणात आपल्या कार्यकर्त्यांना एक महत्त्वपूर्ण आवाहन केलं आहे.

बदलापूर (Badlapur) येथील घटनेनंतर त्यांनी मनसैनिकांना फोन करुन एक आवाहन केलं आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ मनसेच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये त्यांनी "या गोष्टीच त्या मुलींना आणि त्यांच्या घरच्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या, तुम्ही देखील त्या मुलींच्या घरच्यांचा आधार व्हा"; असा सल्ला मनसैनिकांना दिला आहे.

कोलकाता आणि बदलापूर घटनांवरून राज ठाकरे यांनी गुन्हेगारांवर प्रशासनाचा धाक राहिला नसल्यामुळेच अशा घटना घडत असल्याचं म्हटलं आहे. शिवाय पुरोगामी महाराष्ट्रात बदलापूरसारखी (Badlapur) घटना घडते ही प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब असल्याचंही ते म्हणाले. मात्र, या घटनांवरून संवेदनशीलता दाखविण्याचं आवाहन देखील त्यांनी मनसैनिकांना केलं आहे.

एक्स अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पीडित मुलींना कुणीही भेटायला जाणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन मनसैनिकांना (MNS) केलं आहे. ट्विटमध्ये लिहिलं, "आता एकच गोष्टीची काळजी घ्या. सारखे सारखे लोक येतील आणि त्या मुलींना व त्यांच्या घरच्यांना भेटून भेटून छळतील.

त्या मुलींना आयुष्यभराचा त्रास देतील. त्यांचं घर कुणाला कळणार नाही, त्यांचं नाव कळणार नाही याची दक्षता घ्या. पोलिसांशी बोलून घ्या. त्यांच्या घरी कुणी जाणार नाही, त्यांना छळणार नाही, त्या मुलींना कुणी त्रास देणार नाही याची काळजी घ्या. त्या दोघींच्या पुढे आयुष्य पडलंय. त्या मुली लहान आहेत."

घरच्यांनाही आधार द्या

तसंच या सगळ्या प्रकरणात इतर कुणी राजकारणी भेटतील किंवा काय करतील मला माहिती नाही. पण आपल्याकडून ही गोष्ट होता कामा नये. त्यांच्या घरच्यांनाही आधार द्या. त्यांना समजावून सांगा. त्या मुलींना त्रास होणार नाही एवढं फक्त बघा असंही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT