Badlapur Rape Case : बदलापूर अत्याचार प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. याप्रकरणी न्यायालयाने सुमोटो याचिका करून घेतली दाखल करुन घेतली आहे. आज गुरुवारी (ता.22 ऑगस्ट) रोजी सकाळी याप्रकरणाची तातडीची सुनावणी होणार आहे.
बदलापुर अत्याचार प्रकरणाचे पडसाद आता राज्यासह देशभरात उमटत आहेत. या प्रकरणावरुन देशाच्या संसदेत देखील आवाज उठवण्यात आला. पोलिसांची या प्रकरणातील भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
या घटनेचे गांभीर्य पाहता आता न्यायालयाने देखील महत्वाची भूमिका घेतली आहे. त्यानुसार आता मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court ) याप्रकरणी सुमोटो याचिका दाखल करून घेतली दाखल असून आज त्यावर तातडीची सुनावणी होणार आहे. ही सुनावणी न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठापुढे होणार आहे.
बदलापूरमधील अत्याचाराच्या घटनेची प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटीमार्फत चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, बदलापूरमधील (Badlapur) अत्याच्याराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून 24 ऑगस्टला 'महाराष्ट्र बंद'ची हाक देण्यात आली आहे. तर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आता गुन्हा नोंद करण्यासाठीही आता आता आंदोलन करावे लागणार का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.