Raj Thackeray-Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

मी स्वतः सत्तेच्या खुर्चीवर बसणार नाही; तुम्हाला बसवेन : राज यांचा उद्धव ठाकरेंना टोला

सध्याच्या घडामोडींमुळे शिवसेनेला सहानुभूती मिळतेय, हा भ्रम आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मी तुम्हाला म्हणजे तुम्हालाच सत्तेच्या खुर्चीवर बसवणार आहे. मी स्वतः सत्तेच्या खुर्चीवर उडी मारून बसणार नाही, असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपले बंधू तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लगावला आहे. तसेच, आगामी निवडणुका स्वबळावर लढविण्याची तयारी करा, असे आवाहन त्यांनी मनसैनिकांना केले. (Raj Thackeray's big announcement; Prepare to fight elections on your own)

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला. तसेच, सध्याच्या घडामोडींमुळे शिवसेनेला सहानुभूती मिळतेय, हा भ्रम आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे म्हणाले की, लवकरच आपण सत्तेच्या खुर्चीवर बसू आणि आपल्यातील एकजण त्या सत्तेच्या खुर्चीवर असेल. मी स्वतः त्या सत्तेच्या खुर्चीवर बसणार नाही. यासोबतच राज ठाकरे यांनी ‘एकला चलो रे’ म्हणजे स्वबळावर निवडणुका लढविण्याची तयारी सुरू करा, असा आदेशही मनसैनिकांना दिला आहे. ते म्हणाले की, यापूर्वी जी विधाने आणि बातम्या आल्या, त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. आपण स्वबळावरच निवडणुका लढवणार आहोत. आताच्या राजकारणाला लोक कंटाळली आहेत. सध्या घाणेरडं राजकारण चाललं आहे. सध्याच्या घाणेरड्या राजकारणाला पर्याय म्हणून लोकं आपला विचार करतील. त्यामुळे सकारात्मक विचार ठेवा, लोकांपर्यंत पोहोचा, असा कानमंत्रही त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला.

राज ठाकरे यांनी या मेळाव्यात ‘सहा एम’चा फार्म्युला या वेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला. मेसेज, मेसेंजर, मनी, मसल, माईंड आणि मेक्यॉनिझ या सहा एम सांगून त्यावर काम करण्याचे आवाहन ठाकरे यांनी या वेळी कार्यकर्त्यांना केले. मेक्यॅनिझ म्हणजे टेक्नॉलीजीचा वापर करा, मेसेज म्हणजे पक्षाचे विचार मेसेंजरच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवा. निवडणुकीसाठी पैसा लागतोच, तो कुठून तरी उभा करून आपण निवडणुका लढवू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT