मुख्यमंत्र्यांच्या ‘पीए’ला शिवीगाळ केली का? अब्दुल सत्तार म्हणतात, ‘शिंदेसाहेबांना विचारा...’

मला तेवढं समजत नाही का? मी ४२ वर्षांचा राजकारणी आहे. ते क्लासवन अधिकारी आहेत
Abdul Sattar-Ekanth shinde
Abdul Sattar-Ekanth shindeSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या खासगी सचिवांना मी शिवीगाळ कसा करेन. मला तेवढं समजत नाही का? मी ४२ वर्षांचा राजकारणी आहे. ते क्लासवन अधिकारी आहेत, मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव आहेत. त्यांना शिवीगाळ करण्याचा प्रश्नच नाही. वाटलं तर तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारा, असे स्पष्टीकरण कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी शिवीगाळच्या आरोपावर दिले. (Did you abuse the Chief Minister's PA? Abdul Sattar says, 'Ask Shinde Saheb...')

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्र्याचे खासगी सचिवांना शिवीगाळ केल्याचा आरोप होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सत्तार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. कालच्या बैठकीत शिवीगाळ वगैरे काही झाली नाही. अडीअडचणीच्या संदर्भात सर्व आमदारांनी चर्चा केली. तशी मीही चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आमच्या सूचना मांडल्या. ज्या कामांना स्थगिती वगैरे होती, तेही प्रश्न मांडण्यात आले. आमदारांच्या मागण्यांकडे विशेष लक्ष देण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले, असे सत्तार यांनी सांगितले.

Abdul Sattar-Ekanth shinde
मोहिते-पाटील, बाबूराव पाटील-अनगरकर यांना मी कधीही विसरू शकत नाही : शिवाजीराव पंडित भावूक

कामं होत नाहीत, स्थगितीचा विषय होता, त्यामुळे तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिवांना शिवीगाळ करत बाहेर पडला, अशी चर्चा आहे. त्यावर काहीसे चिडत सत्तार यांनी मी शिवीगाळ कसा करेन. मला तेवढं समजत नाही का? मी ४२ वर्षांचा राजकारणी आहे. कुणाला शिवीगाळ कशाला करेन. ते क्लासवन अधिकारी आहेत, मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव आहेत. त्यांना शिवीगाळ करण्याचा प्रश्नच नाही, असेही अब्दुल सत्तार म्हणाले.

Abdul Sattar-Ekanth shinde
एकनाथ शिंदे गटाने नाव आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगाला हे तीन पर्याय दिले

ते म्हणाले की, मी फक्त एवढंचं बोललो की आमची जी कामं आहेत, ती लवकरात लवकर करा. पुढे निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे आणि आचारसंहिता लागल्यानंतर मंजूर पैसेही खर्च करता येणार नाहीत. यापेक्षा दुसरं काही झालेलं नाही. वाटलं तर तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारून घ्या. आम्ही समोरासमोरच होतो. मी संतप्त होऊन बाहेर वगैरे काही पडलो नाही. माझ्या अगोदर शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील गेले. त्यानंतर मी गेलो. दवाखान्यात माझा एक पेशंट होता, मला तिकडे जायचे होते, त्यामुळे मी तिकडे गेलो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com