Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray News : लोकसभा लढवणार नसल्याचं सांगत, राज ठाकरेंनी विधानसभेबाबत जाहीर केली भूमिका, म्हणाले...

Mayur Ratnaparkhe

MNS Gudipadwa Melava : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा आज(मंगळवार) मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर पार पडला. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका जाहीर केली. ज्याची सर्वांनाच उत्सुकता होती.

राज ठाकरे(Raj Thackeray) म्हणाले, 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे. हे मी सगळ्यांसमोर जाहीर करतो. माझ्या गावागावांमधून सगळ्या महाराष्ट्रातून आलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचं आहे, विधानसभेच्या तयारी लागा. जोरात विधानसभेच्या तयारीला लागा. पुढच्या गोष्टी पुढे. आपण कसलाही विचार न करता आता केवळ बांधणीचा विचार केला पाहिजे.

त्यासाठी म्हणून मी महाराष्ट्रभर तुम्हाला सगळ्यांना भेटण्यासाठी लवकरच आपल्यासमोर येत आहे. आज जे काही मला मांडायचं होतं ते मी आपल्यासमोर मांडलेलं आहे. उद्या अजून सर समजा समोरच्याची पकपक झाली. तर अजून मी माझ्या तोंडाची दारं-खिडक्या उघडण्यासाठी मी मोकळा आहे, आपण निश्चिंत रहा.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याचबरोबर 'माझा माझ्या महाराष्ट्र सैनिकांवर विश्वास आहे. आपण या महाराष्ट्राला योग्य मार्ग निश्चित दाखवू. पण माझी महाराष्ट्राकडूनही अपेक्षा आहे. कृपाकरू व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका. ज्या प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रात सुरू आहे, त्याला जर राजमान्यता पुढे मिळत गेली. पुढचे दिवस भीषण आहेत. पण या आजच्या परिस्थितीत जेव्हा मी सर्व बाजूला पाहतो. त्यावेळी मला असं वाटतंय की आज किमान पुढील पाच वर्षांसाठी तरी विचार आपल्याला पुढच्या 50-100 वर्षांचा करायचा असतो, पण मी जेव्हा देंवद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदेसोबत बसलो होतो तेव्हा माझं आणि फडणवीसांचं बोलण झालं, तेव्हा मी म्हणालो की मला वाटाघाटीच्या फंद्यात पाडू नका.' असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

तसेच, 'मी म्हणालो मी तुम्हाला आज सांगतोय की मला राज्यसभाही नको आणि विधानपरिषदही नको. पण या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे. त्यासाठी माझ्या अपेक्षा आहे. त्याही पूर्ण झाल्या नाहीत, तर राज ठाकरेंचं तोंड आहेच. पण या पुढच्या भविष्यासाठी, खंबीर नेतृत्वाची गरज असताना म्हणून मी त्यांना सांगितलं मला काहीही अपेक्षा नाहीत.' असंही राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

याशिवाय मेळाव्यात बोलतान राज ठाकरे म्हणाले, "2014 साली नरेंद्र मोदी (Narendra Modi) पंतप्रधान व्हावेत हे बोलणारा मी पहिला माणूस होतो. ज्यावेळी भाजपमधील कोणी हे बोललं नव्हतं, त्यावेळी मी बोललो होतो. पण 2014 नंतरची भाषण ऐकल्यावर वाटलं मी जे ऐकलं ते या 5 वर्षात दिसत नाहीये. नोटबंदी, बुलेट ट्रेन हे निर्णय मला पटले नाहीत. शिवाय उद्या कितीही चांगले संबंध झाले तरीही ज्या गोष्टी पटल्या नाहीत त्याला टोकाचा विरोध आणि ज्या पटल्या त्याला समर्थन करणार." असंही त्यांनी भाषणात आधी स्पष्ट केलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT