Lok Sabha Election 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मंगळवारी (ता.9) गुढीपाडवा मेळाव्यात लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले. तर या लोकसभा निवडणुकीत देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना Narendra Modi बिनशर्त पाठिंबा दिला आहे. तसेच मनसैनिकांना विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. राज ठाकरेंच्या या भूमिकेचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वागत केले आहे. Lok Sabha Election Devendra Fadnavis welcome Raj Thackeray.
फडणवीस Devendra Fadnvais यांनी ट्विट करून राज ठाकरेंचे आभार मानत महायुतीत स्वागत केले. ते म्हणाले, राज ठकारेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्त्वावर विश्वास ठेवला आहे. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी, तसेच भक्कम महाराष्ट्राच्या उभारणीसाठी, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला त्यांनी पाठिंबा दिला आहे. त्याबद्दल राज ठाकरे यांचे फडणवीसांनी आभार मानले. तसेच आपण सारे मिळून निश्चितच जनतेच्या आशाआकांक्षांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण ताकदीनिशी संकल्पबद्ध होऊ या, असे आवाहनही फडणवीसांनी राज ठाकरेंना केले आहे.
दरम्यान, राज ठाकरे Raj Thackeray आणि आमची विचारधारा एकच असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ते महायुतीत येण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर राज ठाकरे दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर झालेल्या विविध चर्चा राज ठाकरेंनी मेळाव्यात बोलताना फेटाळल्या आहेत. बाहेर पडलो त्याचवेळी शिवसेनेचा प्रमुख होऊ शकलो असतो. पण पक्ष फोडून नाही तर स्वतंत्र्य पक्ष काढून राजकारण करण्याचे ठरवले होते. तसेच कष्टाने इंजिन चिन्ह मोठे केले आहे. ते सोडून इतर कोणत्याही चिन्हावर निवडणूक लढवणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आता राज ठाकरेंच्या मिळालेल्या पाठिंब्यामुळे राज्यातील महायुतीची ताकद वाढली आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीत मिशन ४५ पूर्ण करण्यासाठी आता मुख्यमंत्री शिंदे Eknath Shinde, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार यांच्यासह आता राज ठाकरेंही प्रयत्न करणार आहेत. राज ठाकरेंनी मोदींच्या विकासात्मक भारतावर विश्वास ठेवल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनीही त्यांचे स्वागत केले आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.