Rajan Vichare Sarkarnama
मुंबई

Rajan Vichare : हा घ्या पुरावा, दुबार दीड लाख मतदारांच्या नावासह राजन विचारेंची तक्रार

Pradeep Pendhare

Mumbai News : लोकसभा ठाणे मतदारसंघातील निवडणूक चांगलीच गाजली. शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशी लढत या मतदारसंघात झाली. शिवसेना ठाकरे पक्षाचे कट्टर शिवसैनिक राजन विचारे यांचा इथं पराभव झाला. मात्र राजन विचारे यांनी निकालानंतर पराभवाच्या कारणांचा शोध घेतला.

सत्ताधाऱ्यांमार्फत बोगस मतदान झाल्याचा आरोप केला आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या सहा विधानसभा मतदारसंघात सुमारे 1 लाख 66 हजार दुबार मतदारांची नोंदणी झाल्याची आकडेवारी पुराव्यासहीत राजन विचारे यांनी समोर आणली आहे.

शिवसेना (Shiv Sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार राजन विचारे यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीतील दुबार नावांची आकडेवारी, दुबार मतदारांची दोन ते तीन वेळा केलेल्या मतदाराची आकडेवारी पुराव्यासहीत भारतीय निवडणूक आयोग तसेच निवडणूक अधिकारी ठाणे यांना दिली. परंतु जिल्हा प्रशासनाकडून लेखी उत्तर मिळत नसल्याने राजन विचारे यांनी पुन्हा स्मरणपत्र दिले.

राजन विचारे यांनी जिल्हाधिकारी यांची शिष्टमंडळासह भेट घेतली. स्मरणपत्र देत 20 मे रोजी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर अधिकाऱ्यांकडून 17-सी अर्जावर नमूद केलेले मतदारांची संख्या व चार जून 2024 रोजी निकालानंतर फाॅर्म नंबर 20 वर केलेल्या मतदारांच्या संख्येमध्ये तफावत असल्याने स्पष्टीकरण जिल्हा प्रशासनाकडे राजन विचारे यांनी मागितले आहे. तसेच मतदान केंद्रावरील ईव्हीएम (EVM) मशीनच्या मतदानच्या शेवटच्या वेळेत ही तफावत असल्याचा आरोपही राजन विचारे यांनी केला आहे.

मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातील 'ईव्हीएम'द्वारे मतमोजणी झालेल्या आकडेवारीत आणि व्हीव्हीपॅट स्लीपमध्येही तफावत असल्याचे राजन विचारे यांनी निदर्शनास आणून दिले आहे. लोकसभा निवडणुकीला मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघात 3410, ओवळा माजिवडा 29082, कोपरी पाचपाखडी 21320, ठाणे 16760, ऐरोली 39590 आणि बेलापूर 25848 असे दुबार नावांची आकडेवारी समोर येत असल्याचा आरोप राजन विचारे यांनी केला आहे. निवडणूक आयोगाकडे अधिकृत पुरावे दिले आहेत. त्याची त्यांनी पडताळणी करावी आणि आमच्या तक्रारीची शंका दूर करावी. मात्र प्रशासनाकडून शंकेच्या निरासनासाठी साथी दखल देखील घेतली जात नाही, असा आरोप राजन विचारे यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT