Shrikant Shinde, Raju Patil Sarkarnama
मुंबई

Lok Sabha Election : विकासकामांतून पॉकेटमनीसाठी पैसे; मनसे आमदाराचा मुख्यमंत्री पुत्रावर गंभीर आरोप

शर्मिला वाळुंज

Kalyan Lok Sabha Constituency Politics : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा मतदारसंघात राजकीय नेत्यांमध्ये एकमेकांविरोधात फटकेबाजी सुरू झाली आहे. शिवसेना शिंदे गट, भाजप आणि मनसेचे नेते विकास कामांवरून एकमेकांना टोले लगावण्याची एकही संधी सोडत नाहीत. विकास कामांवरून भाजप मनसेकडून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना वारंवार लक्ष केले जात आहे.

मी केलेली विकास कामे छातीठोकपणे सांगू शकतो. विरोधक कामे सांगू शकतात का? असा टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे मनसे व भाजपला लगावला होता. आता मनसे आमदार राजू पाटील यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागली आहे, तसतसे कल्याण लोकसभा मतदारसंघातील राजकारण तापत आहे. कधी भाजप विरुद्ध शिवसेना (शिंदे गट ) तर, कधी मनसे विरुद्ध शिवसेना (शिंदे गट ) असे चित्र पाहायला मिळत आहे. तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडून आरोप - प्रत्यारोप केले जात आहेत. त्यामुळे कल्याण लोकसभा हा चर्चेचा विषय ठरला आहे.

डोंबिवलीमधील एका कार्यक्रमानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना नाव न विरोधकांना टोला लगावला. आम्ही टीकेकडे लक्ष देत नाही. तर दिवसरात्र लोकांची कामे करतो. कल्याण डोंबिवलीत जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, चांगले रस्ते, मेट्रो, फ्लाय ओव्हर उभारणे हे आपले ध्येय आहे. कोणती कामे केलीत, कोणती कामे सुरू आहेत आणि कोणती होणार आहेत, हे मी छाती ठोक पणे सांगू शकतो. दुसरे कोण विरोधक कामे सांगू शकतात का? मी अमुक काम केले, तमुक कामे केली, हे सांगण्याची हिंमत आहे का? विरोधकांकडे टीका करण्याशिवाय काही दुसरे काम नाही. म्हणूनच मी त्यांच्या टीकेकडे लक्ष देत नाही आणि माझी ती सवय नाही, असा टोला शिंदे यांनी हाणला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मनसे आमदर राजू पाटील यांनी श्रीकांत शिंदे यांच्या टीकेला मनसे स्टाईल आणि ठाकरे शैलीत उत्तर दिले आहे. मनसे आमदार पाटील यांनी नाव न घेता शिंदे यांना टोला लगावला. सगळी कामे तेच करत आहेत. आम्ही गो.. खेळत असतो, सगळी कामे तेच करतायेत. वडिलांच्या खात्यातून पैसे आणून हुशाऱ्या करण्यापेक्षा तिथे लोकांच्या हिताची कामे दाखवा. कालच एमआयडीसी निवासी विभागात नागरिक रस्त्यावर उतरले होते. कारण जी रस्त्याची कामे करायला पाहिजे ती केली केली नाहीत. फक्त रस्त्याची कामे आणायची. त्यातून पॉकेटमनीसाठी पैसे काढायचे. याला जर विकास बोलत असतील तर त्यांना लखलाभ. त्यांनी आमचा पलावा पूल, दिव्याचा पुल करावा. मानकोली पुलाची अलायमेंट चेंज झाली आहे ती करावी, असे प्रत्युत्तर आमदार राजू पाटील यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT