MNS MLA Raju Patil News : " राजसाहेब हे मैत्रीला आणि शब्दाला जागणारे आहेत. विधानपरिषद असो किंवा राज्यसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला ज्यांनी राजसाहेबांना विनंती केली, त्यांच्या विनंतीला मान देऊन राजसाहेबांनी आम्हाला त्यांना मतदान करायला सांगितलं. इतकं होतं तर उद्धव ठाकरेंनी का नाही विनंती केली? आणि आमचा पक्ष कसा चालवायचा याचे सल्ले आम्हाला कोणाला देऊ नयेत. २००६ च्या स्थापनेपासून राजसाहेबांनी इतक्या चढ-उतारात पक्ष चालवला आहे आणि त्यांच्या डोक्यात त्यांना कुठे जायचं याच्या निश्चित कल्पना आहेत. " असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी ठाण्यात सांगितलं आहे.
आमदार राजू पाटील म्हणाले, 'मागे मी मतदान केलं किंवा अर्ज भरले त्यावेळी आम्हाला त्या पक्षाने विनंती केली. बाकी कुणी केली नाही. जसं की उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी कधी राज ठाकरेंना विचारलं नाही, की इथे मतदान करा इथे मदत करा. एका जागेने आमचं काही सध्या होणार नाही किंवा एका मताने कुणाला फरक पडतो, कुणाला नाही पडत. मात्र राज ठाकरे हे मैत्रीला जागणारे आहेत. ते सरसकट राजकार म्हणून बघत नाही, की यांची जिरवायची ना मग असं करू.'
याशिवाय 'तुम्हाला सांगतो धनंजय महाडिक(Dhananjaya Mahadik) जे खासदार झाले, त्यांना त्यावेळी मनसेचं मत खूप महत्त्वाचं ठरलं. जर मग यांना(ठाकरे गटाला) गरज होती तर का नाही विचारलं? बरं हे सगळं करत असताना आमचा पक्ष कसा टिकवायचा, कसा चालवायचा? हे आम्हाला कुणी सांगायची गरज नाही. राज ठाकरे तेवढे प्रगल्भ आहेत. त्यांना या परिस्थितीचा आढावा येतो त्यानुसार ते आराखडे बांधतात.'
तसेच '2006पासून पक्ष टिकून आहे, या भाऊगर्दीत या सत्ताकारणात, या पैसाकारणात या राजकारणात हा पक्ष टिकणंही ही देखील एक प्रकारची उपलब्धी आहे. त्यासाठी कधीकधी काही निर्णय़ घ्यावे लागतात आणि ते योग्य असतात. पक्ष म्हणून राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका आम्हालाही नेहमीच योग्य वाटते.' असंही आमदार राजू पाटील(Raju Patil) यांनी यावेळी स्पष्ट केलं.
याचबरोबर 'मोतश्रीवर बाळासाहेबांच्या फोटोसमोर अबू आझमींचं स्वागत केलं गेलं, आम्ही यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? त्यांना लाज वाटायला हवी. त्यावर कोणी बोलत नाही. त्यामुळे त्यांनी कसाही त्यांचा पक्ष टिकवायाचा आणि आम्ही जरा कुणाला मदत केली, की लगेच तुम्ही असं कसं केलं असं बोललं जातं. आम्ही आमचा मुद्दा, हिंदुत्व आणि मराठीबाणा कधीही सोडलेला नाही आणि सोडणारही नाही.'
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.