Aditya Thackeray Vs MNS : आदित्य ठाकरेंना रोखण्यासाठी 'मनसे' तयारी; संदीप देशपांडे झुंज देणार?

Sandeep Deshpande in the election arena against Aditya Thackeray in Worli constituency? 'मनसे'ने राज्यात 250 जागा लढण्याची तयारी सुरू केली आहे. शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघात 'मनसे'चे संदीप देशपांडे निवडणुकीच्या रिंगणात असतील, अशी चर्चा आहे.
Aditya Thackeray Vs MNS
Aditya Thackeray Vs MNSSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे म्हणजे, वाघाच! शिवसेना जेव्हा फुटली, त्यावेळी आदित्य ठाकरे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. गद्दारांना अंगावर घेतलं. '50 खोके एकदम ओके', ही घोषणेनं महाराष्ट्र दणाणून सोडला.

आदित्य ठाकरे यांना रोखण्यासाठी आता वरळी विधानसभा मतदारसंघात राजकीय चक्रव्यूह आखली जात आहेत. आदित्य ठाकरे यांना रोखण्यासाठी महायुतीमधील सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावला असून, त्यात अपक्षांची संख्या वेगळी राहणार आहे. 'मनसे'ने देखील वरळी विधानसभा मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केली आहे.

ठाकरे परिवारातून पहिल्यादांचा कोणी निवडून लढवली असेल, तर ती आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी. आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा निवडणूक 2019 मध्ये लढवली. त्यावेळी त्यांचे चिन्ह धनुष्यबाण होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर पुलाखालून बरचं पाणी केले. भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. उद्धव ठाकरे यांच्या हातातून शिवसेना आणि शिवसेनेचे पक्षचिन्ह धनुष्यबाण दोन्ही गेलं.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि पक्षचिन्ह माशल झालं आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती बदलली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुका येऊ घातल्यात. त्यामुळे सर्वच पक्षांची आपपाले मतदारसंघ निश्चित करण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचा राडा वेगळाच आहेत. त्यामुळे जागा वाटपावरून पुढे बराच खळ रंगणार आहे.

Aditya Thackeray Vs MNS
Milind Narvekar : मिलिंद नार्वेकर शपथ घेऊन निघाले, सत्कार घेणे का विसरले?

महाविकास आघाडी आणि महायुतीत जागा वाटपावरून बरीच राजकीय जिरवाजिरवी रंगणार असतानाच, राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) एकला चलो रेची भूमिका घेतली. लोकसभा निवडणुकीला नरेंद्र मोदी यांना राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता. परंतु विधानसभा निवडणुकीत त्यांनी राज्यात 250 जागा लढवण्याचे जाहीर करत पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचा आदेश दिला आहे. यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जागेवर तगडे आव्हान देण्याची तयारी मनसेकडून सुरू आहे.

Aditya Thackeray Vs MNS
Manda Mhatre Vs Ganesh Naik : माझ्या नादाला लागाल तर सोडणार नाय! मंदा म्हात्रेंचा थेट गणेश नाईकांना इशारा

वरळी मतदारसंघात छुपे सर्व्हे सुरू

आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघात 'मनसे'ने चाचपणीबरोबर काही सर्व्हे सुरू केले आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरेंभोवती राजकीय चक्रव्यूह आखण्यात मनसे पुढे असल्याचे दिसते. मनसेकडून आदित्य ठाकरे यांच्याविरोधात संदीप देशपांडे यांचे नाव चर्चेत आहेत. संदीप देशपांडे मनसेचे नेते असून राज ठाकरे यांच्याबरोबर ते अमित ठाकरे यांचे निकटवर्तीयांपैकी एक आहेत. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून संदीप देशपांडे त्यांच्याबरोबर आहेत. आदित्य ठाकरे यांच्यासमोर संदीप देशपांडे उमेदवार उभा असल्याच ही लढत रंगतदार होईल, असा अंदाज आहे.

नागरिक राज ठाकरेंना भेटले

'मनसे'कडून राज्यातील सर्वच जागांवर चाचपणी सुरू आहे. यातच मुंबईमधील वरळी मतदारसंघात संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे काम करत आहे. वरळी नागरी प्रश्नांवर हे दोघे नेते अधिकच आक्रमक दिसत आहेत. यातच वरळी नागरी समस्यांबाबत स्थानिक नागरिकांनी, संघटनांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. नागरी समस्यांविषयी राज ठाकरे यांच्याकडे प्रश्न आणि काही मुद्दे मांडले. वरीळीत प्रश्नांबाबत संबंधित अधिकारी यांना भेट घेऊन आणि त्यावर मंत्र्यांना लक्ष घालण्यास भाग पाडू, असे आश्वासन राज ठाकरे यांनी संघटनांशी चर्चा करताना दिले.

संदीप देशपांडेंसाठी चाचपणी?

वरळी मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे आमदार आहेत. असे असताना स्थानिक नागरिकांनी थेट राज ठाकरे यांच्याशी नागरी समस्यांवर संवाद साधला. त्यामुळे मनसे या मतदारसंघात वेगळ्यापद्धतीने चाचपणी करत असल्याचे दिसते. मनसे वरळी मतदारसंघातून संदीप देशपांडे यांचा चेहरा आदित्य ठाकरे यांच्यासमोर उभा करू शकतो, अशा चर्चांना उधाण आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com