Uddhav Thackeray, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Thackeray Vs Shinde : आदित्यला CM करण्यासाठी ठाकरेंचा शिंदेंना संपवण्याचा प्लॅन; राजू वाघमारे नेमके काय म्हणाले?

Raju Waghmare : एकनाथ शिंदे नक्षलवादी भागाचे पालकमंत्री होते. त्यावेळी त्यांना झेड प्लस सेक्युरिटीची गरज होती. ती ठाकरेंच्या एका सहीने मिळाली असती. मात्र ती सही दिली नाही

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : शिवसेना फुटल्यानंतर शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांकडून एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेस सोडून शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर प्रवक्ते राजू वाघमारे Raju Waghmare हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर तुटून पडत आहेत. आता वाघमारेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा प्लॅन होता, असा गंभीर आरोप केला आहे. वाघमारेंचा या आरोपाने राज्यातील राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.

राजू वाघमारे म्हणाले, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंचा Uddhav Thackeray एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याचा डाव होता. एकनाथ शिंदे नक्षलवादी भागाचे पालकमंत्री होते. त्यावेळी त्यांना झेड प्लस सेक्युरिटीची गरज होती. ती ठाकरेंच्या एका सहीने मिळाली असती. मात्र ती सही दिली नाही, कारण शिंदेंचा जीव गेला पाहिजे, त्यामुळे ते बाजुला होतील. शिंदेंना संपवल्यानंतर आदित्य ठाकरेंना Aditya Thackeray मुख्यमंत्री करता येईल, हा डाव ठाकरेंचा होता, असा थेट आरोप वाघमारेंनी केला आहे.

ठाकरेंवर आरोप केल्यानंतर राजू वाघमारेंनी आपला मोर्चा खासदार संजय राऊतांकडे Sanjay Raut वळवला. संजय राऊतांनी ठाकरेंना पदावरून बाजूला करण्यासाठी कटकारस्थान केल्याचाही दावा त्यांनी केला. वाघमारे म्हणाले, ठाकरेंना पदावरून हटवण्यासाठी संजय राऊतांनी दोन बैठका घेतल्या होत्या. आपण ज्या पक्षात आहोत, त्याच पक्षाच्या प्रमुखाविरोधात राऊतांनी हॉटेल हयातमध्ये काही नेत्यांच्या बैठका घेतल्या होत्या. ठाकरेंना बाजूला करून सत्ता स्थापनेचा विचार राऊतांचा होता, असा दावाही वाघमारेंनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अमित देशमुखांनी सांगितलं कारणहॉटेल हायातमध्ये राऊतांनी घेतलेल्या बैठकांना अजित पवार, सुनील तटकरे, एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर आदी नेते उपस्थित होते, असेही वाघमारेंनी सांगितले होते. यापूर्वीही वाघमारेंनी राऊतांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ठाकरेंवर निशाणा साधला होता. राऊतांना ठाकरेंचे काहीतरी मोठे सिक्रेट माहिती आहे, त्यामुळे पक्षाची वाताहत होत असली तरी ठाकरे काही बोलत नाहीत, असे टोला वाघमारेंनी लगावला होता. दरम्यान, वाघमारेंच्या आरोपांनी मात्र राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT