Dhananjay Mahadik News, Chandrakant Patil News, Rajyasabha election 2022 News
Dhananjay Mahadik News, Chandrakant Patil News, Rajyasabha election 2022 News sarkarnama
मुंबई

महाडिकांनी वाढविले शिवसेनेचे टेन्शन : विजयासाठीच्या १० मतांची व्यवस्था झालीय

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राज्यसभेची (Rajya Sabha) तिसरी जागा निवडून आणण्यासाठी आम्हाला आणखी १० मतांची गरज आहे आणि त्याची तजबीज भाजपच्या (BJP) राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी करून ठेवली आहे, त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपच्या तीन जागा आरामात निवडून येऊ शकतात, असा भाजपचे राज्यसभेचे उमेदवार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी केला आहे. महाडिक यांच्या दाव्यामुळे शिवसेनेचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे, तसेच राजकीय घोडेबाजारही जोरात रंगण्याची चिन्हे आहेत. (Rajya Sabha: BJP leaders have arranged 10 votes for victory: Dhananjay Mahadik)

भाजपकडून केंद्रीय मंत्री पियूष गोयल, माजी कृषीमंत्री अनिल बोंडे, आणि धनंजय महाडिक यांना राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर आज सकाळी धनंजय महाडिक यांनी माध्यमाशी बोलताना हा दावा केला. (Dhananjay Mahadik News in Marathi)

राज्यसभेची सहावी जागा ही भाजपचीच असणार आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपला आणखी सुमारे दहा मतांची आवश्यकता आहे. त्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे, भाजपच्या तीनही जागा मोठ्या फरकाने जिंकून येतील, असा दावा धनंजय महाडिक यांनी केला आहे.

Dhananjay Mahadik

महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये नाराजी आहे. निधी वाटपावरून शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांमध्ये नाराजीची भावना आहे. त्याचा फायदा राज्यसभेच्या निवडणुकीत आम्हाला होईल. राज्यातील परिस्थिती पाहता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दहा मतांची गोळाबेरीज करून ठेवली आहे. आमदारांमध्ये असंतोष आहे. पसंती क्रमांकानुसार हे मतदान होणार आहे, त्यामुळे पसंती क्रमांकातील विजयाचा भाजपचा हातखंडा पाहता आमच्या तीन जागा सहज निवडून येतील, असा दावा धनंजय महाडिक यांनी केला आहे. आमदारांची नाराजी पाहून मला वाटतं की भाजपचा विजय निश्चित आहे.

काँग्रेस पक्षाकडून उत्तर प्रदेशमधील इम्रान प्रतापगडी यांना राज्यातून उमेदवारी देण्यात आली आहे, त्यावरून काँग्रेसमध्ये नाराजी आहे. त्या नाराजीचा फायदा आम्हाला होईल आणि आम्ही विजय खेचून आणू. तसेच, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेही राष्ट्रवादीवर नाराज आहेत, त्याचा फायदा आम्हाला होईल. तसेच काँग्रेस पक्षाने दिलेल्या उमेदवारीमुळे खुद्द काँग्रेसमध्येही नाराजी असल्याचा दावा महाडिक यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT