शिवसेनेच्या पवारांना कोल्हापूरचेच महाडिक देणार टक्कर; भाजपकडून उमेदवारी जाहीर

BJP | Shivsena | : भाजपकडून तिसऱ्या जागेसाठी धनंजय महाडिक यांचे नाव जाहीर
Dhananjay Mahadik, Sanjay Pawar Latest Marathi News
Dhananjay Mahadik, Sanjay Pawar Latest Marathi News Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्यसभा निवडणुकीची चुरस वाढली आहे. भाजपने तिसऱ्या जागेसाठी कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. आज (रविवारी) रात्री उशिरा दिल्लीतून महाडिक यांचे नाव जाहीर झाले. यापूर्वी संध्याकाळच्या सुमारास भाजपने दोन उमेदवारांची घोषणा केली होती. यात केंद्रीय मंत्री पियूष गोयल आणि माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांच्या नावाचा समावेश होता.

दरम्यान महाडिक यांचे नाव घोषित झाल्यामुळे आता राज्यसभा निवडणुकीची चुरस वाढली आहे. यामुळे यापूर्वी सहाव्या जागेसाठी अर्ज भरलेल्या कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पवार यांची दिल्लीची वाट अवघड झाल्याचे सांगितले जात आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी राज्यात निवडणूक जाहीर झाली आहे. यात आता सात उमेदवारांची घोषणा झाली आहे. भाजपला तिसरी जागा जिंकण्यासाठी १३ मत कमी पडत आहेत.

विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळानुसार भाजपचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेसची एक, काँग्रेसची एक आणि शिवसेनेची एक जागा निवडुन येवू शकते. तर महाविकास आघाडीकडील अतिरीक्त मतांच्या आधारावर शिवसेना वैयक्तिक दुसरी आणि निवडणुकीतील सहावी जागा लढवत आहे. याचसाठी संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसकडून उत्तरप्रदेशमधील कवी आणि काँग्रेसचा अल्पसंख्यांक चेहरा समजले जाणारे इम्रान प्रतापगडी, तर राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे. शिवाय शिवसेनेने विद्यमान खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

  • राज्य विधानसभेचे सध्याचे बलाबल काय सांगते?

महाविकास आघाडीकडे १६९ आमदारांचे संख्याबळ आहे. यात शिवसेना ५६, राष्ट्रवादी काँग्रेस ५३, काँग्रेस ४४, बहुजन विकास आघाडी ३, समाजवादी पक्ष २, प्रहार १, स्वाभिमानी शेतकरी संघटना १, शेकाप १, अपक्ष ८ अशा आमदारांचा समावेश आहे. या संख्याबळानुसार महाविकास आघाडीतील शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे ४२*३ = १२६ म्हणजे ३ खासदार सहज निवडून आणू शकते. तर शिल्लक मत २७ आणि इतर अधिक अपक्ष असे १६ मिळून चौथा खासदार देखील निवडून येण्याची शक्यता आहे.

2. भाजपप्रणित संख्याबळ ११३ :

तर विरोधकांचे संख्याबळ हे ११३ आहे. यात भाजप १०६, रासप १, जनसुराज्य पक्ष १ आणि अपक्ष ५ अशा आमदारांचा समावेश आहे. या संख्याबळानुसार भाजप ४२*२ = ८४ म्हणजे २ जागा सहज निवडून आणू शकतो. त्यानंतर त्यांच्याकडे स्वतःची २२ आणि विरोधकांची ७ मत शिल्लक राहत आहेत. भाजपला तिसऱ्या जागेसाठी १३ मते कमी पडत आहेत.

3. ४ आमदार तटस्थ आणि १ जागा रिक्त

याशिवाय इतर म्हणजे जे आमदार तटस्थ आहेत त्यांचे संख्याबळ ४ आहे. यात एमआयएम २, कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) १ आणि मनसे १ अशा आमदारांचा समावेश आहे. तर शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनाने एक जागा रिक्त आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com