Rahul Bajaj, Vilasrao Deshmukh Sarkarnama
मुंबई

Election News : विलासराव देशमुखांचा पराभव ते बजाज यांचा विजय..! सूत्रधार कोण? राज्यसभा निवडणुकीआधी भाजप नेत्यानं घातला घाव...

Keshav Upadhye Statement : महाविकास आघाडी एकत्र आल्याशिवाय त्यांचा राज्यसभेचा एकमेव उमेदवार निवडून येऊ शकणार नाही. त्यामुळे आघाडीमध्ये सध्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

Rajanand More

Maharashtra Politics : राज्यसभेची निवडणूक जाहीर झाली अन् महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले. एकूण सात जागांसाठी राज्यात निवडणूक होणार आहे. त्यापैकी सहा जागा सहजपणे महायुतीला मिळणार आहे. तर केवळ एकच जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला येणार आहे. मात्र, त्या जागेवरून भलतीच चढाओढ सुरू झाली आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावावर महाविकास आघाडी शिक्कामोर्तब करेल, असे सूचक विधान केले आहे. तर काँग्रेसकडून मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आघाडीचा उमेदवार नेमका कोण असणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

दुसरीकडे आघाडीतील या राजकारणावरून भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी सोशल मीडियात पोस्ट करत म्हटले आहे की, काँग्रेसमध्ये असताना आणि काँग्रेसबाहेर असतानाही शरद पवारांनी अनेकदा राज्यसभा व विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव घडवून आणला, असा दावा उपाध्ये यांनी केला आहे.

आज काळ बदलला आहे. आता स्वतःसाठी त्याच काँग्रेसची मनधरणी करण्याची वेळ शरद पवारांवर आल्याचा दावाही उपाध्ये यांनी पोस्टमध्ये केला आहे. इतिहास साक्षी आहे, असे म्हणत त्यांनी १९९६ मध्ये विधानपरिषद निवडणुकीत विलासराव देशमुख यांचा पराभव, १९९८ मध्ये सोनिया गांधींचे विश्वासू उमेदवार राम प्रधान यांचा पराभव आणि २००६ मध्ये राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार राहूल बजाज यांना पाठिंबा दिल्याने काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाल्याचा इतिहास सांगितला. तसेच यामध्ये शरद पवार होते, असा दावाही त्यांनी केला आहे.

आज मात्र परिस्थिती उलटी आहे. ज्यांना सोबत असतानाही हरवलं, त्यांच्याच दारात जावं लागतंय. यालाच म्हणतात, काव्यगत न्याय, असे उपाध्ये यांनी सोशल मीडियातील पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान, महाविकास आघाडी एकत्र आल्याशिवाय त्यांचा राज्यसभेचा एकमेव उमेदवार निवडून येऊ शकणार नाही. त्यामुळे आघाडीमध्ये सध्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT