Sudhir Mungantiwar, Ravi Rana Latest Marathi News, Rajya Sabha Election Latest Marathi News
Sudhir Mungantiwar, Ravi Rana Latest Marathi News, Rajya Sabha Election Latest Marathi News Sarkarnama
मुंबई

आघाडीही आखाड्यात! निवडणूक आयोगाकडे सुधीर मुनगंटीवार अन् राणांची तक्रार

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यसभा निवडणुकीचे (Rajya Sabha Election) मतदान पूर्ण होऊन आता चार तास उलटले आहेत. भाजपने महाविकास आघाडीच्या तीन आमदारांच्या मतदानावर आक्षेप घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता या आखाड्यात आघाडीने उडी घेत भाजपचे एक आमदार आणि एका अपक्ष आमदाराच्या मतदानावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे आता या निवडणुकीची रंगत वाढत चालली आहे. (Rajya Sabha Election 2022 News)

शिवसेनेने भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या मतदानावर आक्षेप घेतला आहे. याबाबतची तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. मुनगंटीवार यांनी आपली मतपत्रिका निवडणूक प्रतिनिधीकडे दिल्याचा आक्षेप घेतला आहे.

राणा यांनी मतदानावेळी हनुमान चालिसाचे पुस्तक दाखवल्याचा आक्षेप नोंदवला आहे. आता आयोगाकडून या तक्रारीचीही दखल घेतल्याचे समजते. या कारणामुळे मतमोजणी आणखी काही तास लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता भाजप आणि आघाडीच्या तक्रारीवर आयोग काय निर्णय घेणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, भाजपने राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) शिवसेनेचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्या मतदानावर आक्षेप घेत आयोगाचा दरवाजा ठोठावला आहे. त्यामुळे त्यावर निर्णय होईपर्यंत मतमोजणी सुरू होणार नाही, हे स्पष्ट झालं आहे.

निवडणूक अधिकाऱ्यांनी तिघांच्या मतदानावर घेतलेला आक्षेप फेटाळून लावला होता. पण त्याविरोधात भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. त्यानुसार आता आयोगाने ही तक्रार दाखल करून घेत तिघांच्या मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरण तसेच निवडणूक अधिकाऱ्यांचा अहवाल मागवून घेतला आहे.

केंद्रीय आयोगाकडून व्हिडीओ पाहून याबाबत निर्णय घेतला जाईल. त्याबाबत आयोगाकडून काय निर्णय घेतला जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे. आयोगाच्या निर्णयानंतर मतमोजणीला सुरूवात होईल. आयोगाने जर आव्हाड, ठाकूर आणि कांदे यांच्या मतदान बाद ठरवले तर आघाडीच्या उमेदवारांचं विजयाचं गणित बदलू शकतं. त्यामुळे आघाडीला मोठा फटका बसू शकतात.

हे आहेत आक्षेप

जितेंद्र आव्हाड यांनी मतदान केल्यानंतर थेट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हातात मतपत्रिका दिली, तर अशाच प्रकारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यशोमती ठाकूर यांनी नाना पटोले यांच्या हातात मतपत्रिका दिली. त्यावर पराग अळवणी यांनी यावर हरकत घेतली आहे.

सुहास कांदे यांच्याही मतदानावर आक्षेप घेण्यात आले आहेत. त्यांनी आपली मतपत्रिका शिवसेनेच्या प्रतिनिधीला दाखवताना ती राष्ट्रवादीच्या प्रतिनिधीला दिसेल, अशाप्रकारे व्यवस्था केल्याची तक्रार भाजपने केली आहे. त्यामुळे या तिघांचे मतदान बाद करण्याची मागणी भाजपने आयोगाकडे केली आहे.

तर आदित्य ठाकरेंचं मतही बाद झालं असतं

दुसरीकडे शिवसेनेचे आमदार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना दिलेल्या मतपत्रिकेवर निवडणूक आयोगाचा शिक्का नव्हता. त्यामुळे त्यांना मतपत्रिका बदलून देण्यात आली. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मतदान केलं. शिक्का नसलेली मतपत्रिका कशी आली, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. आदित्य ठाकरेंनी शिक्का नसलेल्या मतपत्रिकेवर मतदान केलं असतं तर त्यांचंही मत बाद झालं असतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT