Rajya Sabha Election : आघाडीच्या दोन मतांना सुरूंग; भाजपच्या पथ्यावर पडणार का?

राज्यसभेच्या निवडणुकीत चुरस वाढली...
Shiv Sena, BJP, Congress, NCP Latest Marathi News
Shiv Sena, BJP, Congress, NCP Latest Marathi Newssarkarnama
Published on
Updated on

Rajya sabha Elelction 2022

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिकांना (Nawab Malik) राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करता येणार नाही, हे जवळपास स्पष्ट झालं आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे दुसरे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याही मतदानाच्या अपेक्षा जवळपास मावळल्या आहेत. त्यामुळे आघाडीला मोठा धक्का बसला आहे. (Rajya Sabha Election Latest Marathi News)

मलिकांनी मतदानासाठी तात्पुरता जामीन देण्यासाठी केलेल्या सुधारित याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. विशेष न्यायालयाने जामीन नाकारला असल्याने इथे जामीनावर तातडीने सुनावणी घेता येणार नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केल्यानं मलिकांना धक्का बसला आहे.

Shiv Sena, BJP, Congress, NCP Latest Marathi News
लक्ष्मण जगतापांनी फडणवीसांना 'सीएम साहेब' म्हणून हाक मारली!

देशमुखांची जामीनाची याचिकाही उच्च न्यायालयात आहे. पण अद्याप ही याचिका सुनावणीला आलेली नाही. तर आता मतदारानासाठी जेमतेम दोन तास उरले आहे. या कालावधीत याचिका सुनावणी येणे, त्यावर निकाल देणे, निकालपत्र तुरूंग अधिकाऱ्यांपर्यंत जाणे, तिथून देशमुख विधान भवनात दाखल होणे ही संपूर्ण प्रक्रिया दोन तास होणे, शक्य नाही. त्यामुळे देशमुखांना मतदान करण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे ही दोन्ही मतं जाणार असल्याने आघाडीला फटका बसणार आहे.

Shiv Sena, BJP, Congress, NCP Latest Marathi News
Rajya Sabha Election 2022 : २८५ आमदारांनी मतदान केलं ; आता प्रतिक्षा निकालाची

राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी सत्र न्यायालयाने गुरुवारी परवानगी नाकारल्यानंतर अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच मतदानासाठी आपल्याला एक दिवसाचा जामीन मंजूर करावा किंवा पोलीस बंदोबस्तात मतदान करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com