MVA Sarkarnama
मुंबई

Rajya Sabha Election : महाविकास आघाडी उमेदवार उतरवणार? राज्यात पुन्हा फोडाफोडीचे राजकारण रंगणार?

Maha Vikas Aghadi to Fight Rajya Sabha Election Maharashtra Seat : आता राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार नाही?

Jui Jadhav

Rajya Sabha Election Maharashtra Politics :

येत्या 27 फेब्रुवारीला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. सत्ताधारी महायुतीमधील तीन पक्षांविरुद्ध महाविकास आघाडीमधील तीन पक्षांची ही लढत आहे. राज्यसभेची निवड बिनविरोध व्हावी अशी चर्चा होती. मात्र ती बिनविरोध होणार नाही, असे चित्र सध्या राज्यात सुरू आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार ठरण्याची शक्यता आहे. त्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेनीथला आणि प्रदेशाध्यक्ष Nana Patole हे मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

'काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करू'

महाविकास आघाडीमधून एक उमेदवार राज्यसभेसाठी जाण्याची चर्चा सुरू आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले. आता काँग्रेस जो कोण उमेदवार देईल त्याला शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट ) त्याला पाठिंबा देणार, अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांनी पाठिंबा द्यावा, अशी विनंती काँग्रेस नेत्यांकडून करण्यात येत आहे.

महाविकास आघाडीचा एक उमेदवार राज्यसभेची निवडणूक लढणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीची एकजूट दाखवण्याची ही संधी आहे. त्यामुळे काँग्रेस जो कोणता उमेदवार देईल त्याच्या पाठीशी इतर दोन पक्ष खंबीरपणे उभे राहतील, अशी भूमिका घेण्यात आली आहे. शरद पवारांसोबत याबाबत चर्चा झाली आहे. आता उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभेच्या 5 जागांचा तिढा सुटणार?

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये पाच जागांवरून मतभेद आहेत. वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश झाल्यावर काँग्रेसला या पाच जागांसाठी माघार घ्यावी लागण्याची शक्यता आहे. या विषयासाठी ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीकडे आता सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT