Ncp Ajit Pawar News :
केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी नाव आणि चिन्ह हे अजित पवार गटाला देण्याचा निर्णय दिला. यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले. या सगळ्या घटनांनंतर पक्ष कार्यालय कोण ताब्यात घेणार हा मुद्दा उपस्थित झाला होता, तर आमच्यावर दबाव आहे, असा गौफस्फोट खासदार सुनील तटकरे यांनी केला आहे.
'वैचारिक दबाव टाकण्याचा प्रयत्न'
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत कार्यालय हे बेलार्ड पियर इथे आहे. मात्र, आता राष्ट्रवादी हे नाव आणि चिन्ह Ajit Pawar गटाला गेल्याने शरद पवार गटातील नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे. आमच्यावर असे आरोप केले जात आहेत, तर दुसरीकडे पक्ष कार्यालय ताब्यात घेण्यासाठी आमच्यावर पक्षातील कार्यकर्त्यांकडून दबाव टाकला जात आहे. मात्र, याविषयी जो काही निर्णय असेल तो वरिष्ठ घेतील. जर वक्तव्ये अशीच सुरू राहिली तर त्यांनी समजून जावं, असा इशाराही तटकरे यांनी दिला.
शरद पवार गटाला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखाच मोठा धक्का बसला. अजित पवारांकडे बहुमत असल्याने नाव आणि चिन्ह दोन्ही त्यांच्याकडे देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला. यानंतर अजित पवार गटाने जल्लोष साजरा केला. दुसरीकडे शरद पवार गटाकडून टीका केली गेली. या टीकेवरून आता शरद पवार गटाची गोची होण्याची शक्यता आहे. कारण वारंवार होत असलेल्या आरोपांमुळे त्यांच्याकडून पक्षकार्यालय काढून घेण्याचा दबाव कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांवर आहे.
राष्ट्रवादी हे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला गेल्यानंतर शरद पवार गटातील जे आमदार आहेत, त्यांना अजितदादांच्या गटात येण्याची साद खासदार सुनील तटकरेंनी घातली आहे. दोन गट झाल्यावर काही कारणास्तव ते आमदार शरद पवारांसोबत होते. मात्र, आता पक्ष नावाने चिन्ह आम्हाला आल्यामुळे आता त्यांच्या शंका दूर झाल्या असतील. ते आता आमच्या पक्षात येऊ शकतात. आम्ही त्यांचं स्वागत करू, अशी साद सुनील तटकरे यांनी शरद पवार गटातील आमदारांना घातली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष अजित पवारांचा झाला आहे. आता येत्या दोन दिवसांत शरद पवार गटातील 5 आमदार अजित पवार गटात जाण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काळात शरद पवार गटाचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. आता किती आमदार शरद पवारांसोबत राहतात? हा प्रश्न आहे. उरलेल्या आमदारांना टिकवण्यासाठी आता शरद पवारांना प्रयत्न करावे लागणार आहेत.
R
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.