Chandrashekhar Bawankule, Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

BJP Politics : भाजपचं ठरलं... चौथ्या जागेची चुरस वाढली; आमदारांची तातडीची बैठक

Jui Jadhav

Mumbai BJP Politics News :

राज्यसभेच्या 56 जागांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान होणार असून राज्यातील सहा उमेदवार राज्यसभेत जाणार आहेत. त्यामुळे राजकारण जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजप कोअर कमिटीने आज तातडीची बैठक बोलावली आहे. राज्यसभेच्या चौथ्या जागेसाठी भाजप तयारीत असल्याची चर्चा आहे. यामुळे या बैठकीत भाजपची कोणती व्यूहरचना ठरते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

चौथ्या जागेसाठी भाजप आग्रही

राज्यसभा निवडणूक (Rajyasabha Election) बिनविरोध होण्याची मागणी होत आहे. पण महाविकास आघाडीकडून उमेदवार पुढे येण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेकडून (शिंदे) मिलिंद देवरा (Milind Deora) यांचे नाव पुढे जाण्याची शक्यता आहे. आणि एक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून जाणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे भाजप चौथा उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. तो उमेदवार कोण असेल ची चाचपणी करण्यासाठी ही बैठक महत्त्वाची असल्याचे बोलले जाते.

महाविकास आघाडीचं सरकार असताना भाजपचे (BJP) तिन्ही उमेदवार निवडून आले होते. शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव झाला होता. भाजप आता सत्तेत असल्यामुळे आत्मविश्वासाने आता चौथा उमेदवार देऊन त्यालाही निवडून आणण्याच्या तयारीत भाजप आहे. त्यासाठी या बैठकीत कोणाची नावे द्यायची आणि कोणाला उमेदवारी द्यायची हे निश्चित केले जाऊ शकते.

फडणवीसांकडून तंबी?

राज्यात सध्या सत्ताधारी आमदारांकडून नियमांची पायमल्ली केली जात आहे. भाजप आमदार नियमाचे आणि कायद्याचे उल्लंघन करताना दिसत आहेत. या सगळ्यावर आमदारांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तंबी देण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी एक भाषणावेळी वक्तव्य केले होतं की, आम्हाला कसली भीती नाही कारण सागर बंगल्यावर आपला बॉस बसला आहे. त्यानंतर पुण्याच्या एका कार्यक्रमात एका आमदाराने पोलिसाच्या कानशिलात लागावली होती. त्यांचसोबत उल्हासनगरमध्ये आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी केलेली गोळीबार. अशा प्रकारांमुळे भाजप आमदार वादात सापडले आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःहून तंबी देण्याची शक्यता आहे.

व्हीप कोणाचा?

राज्यात दोन पक्ष फुटल्यानंतर ही पाहिली निवडणूक आहे. आता मुद्दा उपस्थित होतो तो व्हीप कोणाचा लागू होणार याचा. शिवसेना ही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची आहे असा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिला. अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) कुणाचा याचा निर्णय झालेला नाही. मात्र या निवडणुकीसाठी व्हीप कोणाचा लागू होणार हा प्रश्न निर्माण झालेला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने (Shivsena) विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली आहे. त्याचा निकाल जर आधी लागला नाही तर ठाकरे गटाच्या नेत्यांची कोंडी होण्याची शक्यता आहे.

(Edited by Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT