Wagh-Anil Parab sarkarnama
मुंबई

Maharashtra Politics : चित्रा वाघ- अनिल परबांमधील वादावर पडदा? अध्यक्षांच्या दालनात बैठक

Ram Shinde Takes Serious Note of the Chitra Wagh-Anil Parab Clash : सभागृहात झालेल्या खंडाजंगी बाबत बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, 'माझं नाव घेऊन माझ्यावर आरोप करण्यात आले. त्याला मी उत्तर दिलं आहेत. महिलांना हलक्यात घेऊ नका येवढाच माझा मेसेज होता.

Roshan More

Chitra Wagh Vs Anil Parab : विधान परिषदेमध्ये गुरुवारी (ता.20) भाजप आमदार चित्रा वाघ आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. चित्रा वाघ यांनी आक्रमक होत तुमच्या सारखे 56 लोक पायाला बांधून फिरत असल्याचा म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे सभागृहाची मर्यादा पाळली जात नसल्याची टीका होत आहे. चित्रा वाघ आणि अनिल परब यांच्यात झालेल्या खडाजंगीची दखल विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे यांनी घेतली आहे.

आज (शुक्रवारी) अध्यक्षांनी अनिल परब आणि चित्रा वाघ यांना आपल्या दालनात बोलावून घेतले होते. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच संसदीय कामकाज मंत्री चंद्राकांत पाटील हे देखील उपस्थित असल्याची माहिती आहे. अध्यक्षांच्या दालनील बैठकीत नेमके काय झाले या माहिती समोर आली नाही. मात्र, कालच्या प्रकारावर अध्यक्ष, संसदीय कामकाज मंत्री नाराज असल्याचे बोलले जात आहे. सभागृहात झालेल्या वादावर बैठकीत पडदा टाकण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, सभागृहात झालेल्या खंडाजंगी बाबत बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, 'माझं नाव घेऊन माझ्यावर आरोप करण्यात आले. त्याला मी उत्तर दिलं आहेत. महिलांना हलक्यात घेऊ नका येवढाच माझा मेसेज होता. त्यांनी माझं नाव घेतलं मी त्याला उत्तर दिलं, विषयाची सुरुवात मी केली नाही. मी माझं मतं मांडलं.'

परब नेमके काय म्हणाले?

'संजय राठोड, जयकुमारा गोरेच्या केसवर तोंड उघडा. जयकुमारच्या राजीनाम्या मागणी करा. किरीट सोमय्या विषयी का नाही बोलत? त्याची बायको आत्महत्या करायला चालली होती. मनीषा कायंगे आत्ता वरिष्ठा खूश करण्यासाठी आरोप करत आहेत. त्यांची नजर आता उपसभापतिपदावर आहे. सरड्यापेक्षा जास्त रंग बदलला. सरड्याला पण शरम वाटली असेल..

वाघ नेमके काय म्हणाल्या?

मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. 56 लोक चित्र वाघ पायाला बांधून फिरते. तुमच्या हिमत्त असेल तर उद्धव ठाकरेंना विचाराला संजय राठोडांना क्लिन चिट का दिली? असे चित्रा वाघ अनिल परब यांना उद्देशून म्हणाल्या होत्या

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT