Mumbai News, 21 Mar : दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची (Sushant Singh Rajput) मॅनेजर असलेल्या दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणावर महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. कारण दिशाचे वडील सतीश सालियन यांनी या मृत्यू प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी केली आहे.
याबाबतची याचिका त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या विरोधात एफआयआर नोंदवून त्यांची चौकशी करावी तसंच हे सीबीआयकडे सोपवण्याची विनंती देखील त्यांनी याचिकेत केली आहे.
दरम्यान, याच मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी आदित्य यांच्या अटकेची मागणी लावून धरल्यामुळे हे प्रकरण चांगलंच तापलं आहे. अशातच आता या सर्व प्रकरणावर दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे वडील केके सिंह यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
या प्रकरणावर बोलताना त्यांनी दिशा सालियनच्या (Disha Salian) वडिलांनी उचललेलं पाऊल योग्य असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले, याआधी दिशाच्या वडिलांनी या प्रकरणाबाबत त्यांना काहीही माहिती नसल्याचं म्हटलं होतं. ही आत्महत्या देखील असू शकते असं त्यांनी म्हटलं होतं.
मात्र त्यानंतर त्यांनी काय संशोधन केलं आणि कोणत्या आधारावर ते आता ही आत्महत्या नसून हत्या आहे म्हणतायत हे मला माहिती नाही. पण त्यांनी जे काही केलं ते योग्य आहे. त्यांच्या या निर्णयामुळे ती हत्या होती की आत्महत्या हे तरी स्पष्ट होईल आणि सुशांतच्या प्रकरणात देखील काय घडलं ते देखील उघडकीस येईल.
दरम्यान, यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून खूप आशा असल्याचंही म्हटलं. ते म्हणाले, "आता सरकार बदललं आहे, आधीच्या आणि आताच्या सरकारमध्ये खूप फरक आहे. आताच्या मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला खूप आशा आहे आणि ते जे करतील ते बरोबर करतील. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी जेणेकरून ही आत्महत्या होती की हत्या हे समजू शकेल आणि तपास झाल्यास सत्य काय ते समोर येईल."
तर यावेळी त्यांना पत्रकारांनी दिशा सालियनच्या वडिलांनी केलेल्या मागणीप्रणाणे आदित्य ठाकरेंची चौकशी व्हायला पाहिजे का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, "या प्रकरणात त्यांचे नाव संशयाने का घेतलं जातंय ते माहीती नाही. पण तपासात नेमकं काय ते स्पष्ट होईल. मात्र, आता यामध्ये कोणाचा सहभाग होता किंवा नाही हे मी सांगू शकत नाही."
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.