Ramdas Athavale Latest Marathi News
Ramdas Athavale Latest Marathi News sarkarnama
मुंबई

मनसेला मंत्रिपद देण्यास आठवलेंचा विरोध; म्हणाले...

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : मनसेचा (MNS) सत्ता स्थापनेत काही संबंध नाही, त्यामुळे मनसेला मंत्रिपद देण्याचा प्रश्नच येत नाही. तसा विचार सरकार करत असेल तर त्याला आमचा विरोध असेल, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी केले. नव्याने स्थापन झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व भाजप (BJP) सरकारमध्ये मनसेच्या एकमेव आमदार राजू पाटील यांना मंत्रिपद मिळण्याची जोरदार चर्चा आहे. यावर त्यांनी मनसेला उघड उघड विरोध दर्शविला आहे. मंत्रीमंडळात एखादे मंत्री पद आम्हाला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत ते म्हणाले. रिपब्लिकन पक्ष ज्यांच्या बाजूने असतो त्यांना सत्तेवर येण्याची संधी असते, नव्याने आलेल्या सरकारच्या पाठीशी आरपीआय असल्याचे देखील ते म्हणाले. (Ramdas Athavale Latest Marathi News)

कल्याण येथे एका कार्यक्रमासाठी रविवारी रामदास आठवले आले होते. यावेळी ते म्हणाले दोन तृतियांश पेक्षा जास्त आमदार ज्यांच्या बाजूने आहेत, तिच खरी शिवसेना आहे. शिंदे यांनी 200 आमदार निवडून आणू असा विश्वास व्यक्त केला आहे. त्याला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा आहे. आरपीआय ज्यांच्या बाजूला असते त्यांना सत्तेवर येण्याची संधी मिळते.

माझा पक्ष एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी आहे. अधिवेशनापुरते जे मंत्री मंडळ आहे ते शॉर्टमध्ये बनवण्यात येणार आहे. जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, तेव्हा आरपीआयला नक्कीच एखादे मंत्री पद मिळेल सत्तेत सहभाग मिळेल. विधान परिषदेसाठी प्रयत्न सुरू आहे, महामंडळ उपाध्यक्ष सभासद नक्की मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

शिंदे यांचा अधिकाऱ्यांशी फोन वर बोलताना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याबाबत आठवले म्हणाले, कुठल्या कामासाठी जर मुख्यमंत्री बोलले असतील तर तो व्हिडिओ अजिबात गैर नाही. काम करा अस एखाद्या अधिकाऱ्याला सांगणे हे मुख्यमत्र्यांचे कर्तव्य आहे. जरी कुणी याबाबत टीका केली असेल तर त्या टीकेला अर्थ नाही. मुख्यमंत्र्यांना मोबाईलवर बोलण्याचा अधिकार आहे. पूर्वीचे मंत्री मोबाईल वर अनेकांना आदेश देत होते, त्यामुळे यात काही गैर नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT