'गिरीश महाजन बालिश, आजपर्यंत माझी पादत्राणे घेऊनच मत मागत होते!'

एकनाथ खडसे Eknath Khadse यांची गिरीश महाजन यांच्यावर टीका
Eknath Khadse & Girish Mahajan
Eknath Khadse & Girish MahajanSarkarnama
Published on: 
Updated on: 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची नुकतीच विधान परिषदेवर वर्णी लागली आहे. मात्र, खडसे आमदार झाले आणी महाविकस आघाडी सरकार पडले. त्यावरुन भाजपचे (BJP) माजी मंत्री गिरीष महाजन (Girish Mahajan) यांनी खडसे यांच्यावर जहरी टीका केली होती. त्यावर खडसे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

एकनाथ खडसे म्हणाले, "गिरीश महाजन हे बालिश आहेत. त्यांनी आयुष्यभर माझ्या पादत्राणांची सेवा केली. त्यांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही, अशा शब्दांत त्यांनी महाजन यांचा समाचार घेतला. ते प्रगल्भ विचारांचे नाहीत. त्यांना आज माझ्या पादत्राणांची आठवण झाली. आजपर्यंत ते माझे पादत्राणे घेऊन मत मागत होते, त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचे माझ्या पादत्राणाकडे अधिक लक्ष जाते. त्यामुळेच त्यांना माझ्या पादत्राणांची त्यांना जास्त काळजी वाटते, असा हल्लाबोल खडसे यांनी केली.

Eknath Khadse & Girish Mahajan
पवारांच्या आपुलकीने कार्यकर्ता भारावला; विमानाने पोहचवले घरी

एकनाथ खडसे विधान परिषदेचे आमदार झाले. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारचे पडले आणि राज्यात एकनाथ शिंदे गट व भाजपचे सरकार आले. त्यामुळे खडसे यांना आमदारकीवरच समाधान मानावे लागले आहे. हाच धागा पकडत म्हणाजन म्हणाले होते, मंदिरात गेले तर प्रसाद संपला अन् बाहेर आले तर चप्पल चोरीला गेली, अशी त्यांची स्थिती झाली आहे, अशा प्रकारची बोचरी टीका त्यांनी केली होती.

Eknath Khadse & Girish Mahajan
'शिवसेनेला अजिबात धक्का लागलेला नाही'

यावर स्पष्टीकरण देताना खडसे महाविकास आघाडीत आले आणि सरकारच गेले अशा प्रकारच्या विनोदी पोस्ट सोशल मीडियाव व्हायरल होत आहेत, असे महाजन म्हणाले होते. खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यापासूनच महाजन आणि त्यांच्यामध्ये नियमीत आरोप प्रत्यारोप होत असतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com