Ramdas Athawale & Dnyanshwar Wankhede
Ramdas Athawale & Dnyanshwar Wankhede Sarkarnama
मुंबई

समीर वानखेडे यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही ः आठवले उतरले मैदानात

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : एनसीबीचे (NCB) अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना रिपब्लिकन (RPI) पक्षाने जाहीर पाठिंबा दिला आहे. यामुळे समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या पत्नी क्रांती रेडकर (Kranti Redkar) आणि वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी आज (ता.31 ऑक्टोबर) रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्या संविधान निवासस्थानी यांची भेट घेऊन यांचे आभार मानले.

ज्ञानदेव वानखेडे यांनी ते हिंदू दलित पूर्वाश्रमीचे हिंदू महार असल्याचे सर्व पुरावे मंत्री आठवले यांच्याकडे सोपविले. यावेळी आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले, रिपाईचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, सुरेश बारशिंग आदी उपस्थित होते.

रामदास आठवले म्हणाले, मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे समीर वानखेडे या कर्तबगार अधिकाऱ्यावर चुकीचे आरोप करीत आहेत. त्यांच्या जावयावर त्यांनी कारवाई केल्यामुळे ते वानखेडेंवर चुकीचे आरोप करीत आहेत. असे खोटे आरोप करणे त्यांनी थांबवावे. ड्रग्स रोखण्याचे काम वानखेडे करीत आहेत. क्रूझवर केलेली कारवाई योग्य आहे. मात्र, ड्रग्स पार्टी रोखण्याचे काम करणाऱ्या वानखेडे यांच्या खाजगी आयुष्याची जाहीर चर्चा करून आरोपबाजी करणे अत्यंत चुकीचे असून ते मलिक यांनी थांबवावे असे आवाहन आठवले यांनी केले.

यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ज्ञानदेव वानखेडे यांनी आपण हिंदू महार असल्याचे पुरावे म्हणुन त्यांची वंशावळ, गावचे, कॉलेजचे सर्व्हिस बुक पासपोर्ट आदी पुरावे सादर केले. आमच्या संकटकाळात एका प्रामाणिक अधिकाऱ्याच्या कुटुंबाचे खाजगी आयुष्य चव्हाट्यावर आणून खोडसाळ आरोप मलिक अमच्यावर करीत आहेत. मी कधीही धर्मांतर करून इस्लाम स्वीकारला नाही. आम्ही हिंदू मुस्लिम दलित सर्व धर्मांचा आदर करतो. माझा विवाह मुस्लिम महिलेशी झाला आहे. पण मी हिंदू महार आहे. आंबेडकरी अनुयायी आहे. आमच्या पाठीशी केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले ठामपणे उभे राहिल्याचा मला अभिमान आहे, असे ते म्हणाले.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांमुळे आम्ही नोकरीला लागलो. आम्हाला आमचे नेते रामदास आठवले यांचा मजबूत पाठिंबा मिळाल्या मुळे आम्ही नवाब मलिक यांना घाबरणार नाही. त्यांनी कोर्टात जावे मात्र, आमच्या खाजगी आयुष्याबाबत जाहीर आरोप करण्याचे अधिकार मलिक यांना कोणी दिले. मंत्री पदाची शपथ घेताना त्यांनी कुणाचे खाजगी आयुष्य जाहीर करण्याची शपथ घेतली का? असा सवाल क्रांती रेडकर व ज्ञानदेव वानखेडे यांनी केला आहे.

मलिक यांनी राष्ट्रवादीच्या प्रवक्ते पदाचा गैरफायदा घेऊन एका दलित अधिकाऱ्यावर चुकीचे आरोप केले आहेत. वानखेडे यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. आरपीआय त्यांच्या पाठीशी आहे. वानखेडे यांच्या परिवारालाही धमक्या येत आहेत. मुख्यमंत्र्यांनी क्रांती रेडकर यांच्या कुटुंबाला वेळ देऊन भेटले पाहिजे असे आठवले म्हणाले. वानखेडे हे दलित असून त्यांनी कोणत्याही दलितांचा हक्क हिसकावला नाही असे आठवले म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT