Ramdas Athawale Sarkarnama
मुंबई

Ramdas Athawale News : रामदास आठवलेंनी मनातील खंत बोलून दाखवली, केंद्र सरकारकडे केली मोठी मागणी, म्हणाले, 'राज्यात...'

Ramdas Athawale Municipal Wards : सर्व महापालिकांमध्ये सत्तेत भागीदारी मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

Roshan More

प्रकाश लिमये

Ramdas Athawale News : चार सदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये आरपीआय सारख्या छोट्या पक्षांचे सदस्य निवडून येणे कठीण असते; यासाठी नगरपालिका व महानगरपालिकांसाठी ही पद्धत रद्द करावी अशी सरकारकडे मागणी आहे, असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मिरा रोड येथे व्यक्त केले.

मीरा रोड येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्याला आठवले उपस्थित होते. यावेळी त्यांच्या सोबत आरपीआयचे मिरा भाईंदर जिल्हाध्यक्ष देवेंद्र शेलेकर होते. केंद्रात आरपीआयला मंत्रीपद मिळाले आहे परंतू राज्यात हवा तेवढा सत्तेत वाटा मिळत नाही अशी खंत आठवले यांनी व्यक्त केली.

सर्व महापालिकांमध्ये सत्तेत भागीदारी मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक अथवा दोन महामंडळे व एक विधान परिषद सदस्यत्व देण्याचे आश्वासन दिले आहे. भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये निवडणुकीसाठी महायुती झाली नाही तर ते पक्ष स्वतंत्र पणे निवडणूक लढवतात. त्याच धर्तीवर युती न झाल्यास काही जागा लढण्याची तयारी आम्हालाही करावी लागेल असे आठवले यांनी यावेळी सांगितले.

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यामुळे दहा वर्षे मंत्रीपद मिळाले त्यामुळे पक्षाचा देशभर विस्तार करता आला. सध्या २८ राज्ये व ८ केंद्रशासित प्रदेशात आरपीआयच्या शाखा आहेत. नागालँड मध्ये पक्षाचे दोन आमदार आहेत. मणिपूर मध्ये लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला चांगली मते मिळाली होती, असे देखील त्यांनी सांगितले.

विधानसभा लढणार

आगामी पाच राज्यांच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने पक्षाला चिन्ह दिले आहे. दोन राज्यात अरपीआयला सहा टक्के मते अथवा काही उमेदवार निवडून आले तर आरपीआयला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळेल असा विश्वास रामदास आठवले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT