Municipal Corporation News : शिवसेनेकडून शिरसाटांना पुन्हा दणका! महापौरपदाची संधी हुकलेल्या इच्छुकांना स्थायी समितीची खुर्ची

Sambhajinagar Municipal Corporation : छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या स्थायी समितीवर भाजप, शिवसेना आणि एमआयएमच्या सदस्यांची निवड झाली. महापौर पदाच्या इच्छुकांना संधी मिळाली तर संजय शिरसाट यांना पुन्हा राजकीय धक्का बसल्याची चर्चा आहे.
Newly appointed members of the Standing Committee at Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation after the selection process led by Mayor Sameer Rajurkar amid political tussle among BJP, Shiv Sena and AIMIM.
Newly appointed members of the Standing Committee at Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation after the selection process led by Mayor Sameer Rajurkar amid political tussle among BJP, Shiv Sena and AIMIM.Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar Standing Committee : छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर भाजपा-शिवसेना युतीची सत्ता आणि महापौर-उपमहापौर विराजमान झाल्यानंतर आज गुरूवारी (ता.5) स्थायी समितीसह विषय समित्यांसाठीची निवड प्रक्रिया पार पडली. महापौर पदाच्या शर्यतीत असलेल्या बहुतांश इच्छुकांना स्थायी समितीवर घेण्यात आले आहे. तर शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या दोन सदस्यांमध्ये पुन्हा एकदा संजय शिरसाट यांना धक्का देण्यात स्थानिक नेते, पदाधिकारी यशस्वी ठरले आहेत.

स्थायी समिती व विविध विषय समित्यांसाठी आज प्रत्येक पक्षाच्या गट नेत्यांनी बंद लिफाफ्यात आपली नावे महापौर समीर राजूरकर यांच्याकडे दिली होती. संख्याबळानूसार भाजपाचे सर्वाधिक आठ सदस्य हे स्थायी समितीवर गेले आहेत. यात महापौर पदासाठी शर्यतीत असलेले अनिल मकरिये, राजगौरव वानखेडे, माधुरी अदवंत, सुरेंद्र कुलकर्णी यांचा समावेश आहे. या शिवाय अप्पासाहेब हिवाळे, कमल नरोटे, अर्चना निळकंठ, रवि कावडे यांचा समावेश आहे.

भाजपासोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेचे दोन सदस्य स्थायी समितीवर नेमण्यात आले. यात श्वेता त्रिवेदी, राजू राजपूत यांची वर्णी लागली आहे. उपमहापौर, गटनेता नेमताना पालकमंत्री संजय शिरसाट यांना आमदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख तथा उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी दणका देत आपल्या समर्थकांची वर्णी लावली होती. जंजाळ यांच्या उपमहापौर पदाला विरोध करत शिरसाट यांनी दबाव तंत्राचा वापर केला. पण एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने हे दबाव तंत्र तेव्हा त्यांच्यावरच उलटले होते.

स्थायी समितीत वर्णी लागलेले राजू राजपूत, श्वेता त्रिवेदी हे संजय शिरसाट समर्थक जरी असले तरी उपमहापौर पदासाठी आग्रही असलेल्या पालकमंत्री शिरसाट यांच्या कन्या हर्षदा, चिरंजीव सिद्धांत या पैकी कोणालाही संधी मिळाली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नेते चंद्रकांत खैरे यांचे पुतणे आणि दुसर्‍यांदा नगरसेवक झालेल्या सचिन खैरे यांना स्थायी समितीवर संधी देण्यात आली आहे. तर काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीच्या लोकशाही आघाडीकडून अमित भुईगळ यांची अपेक्षेप्रमाणे वर्णी लागली आहे.

एमआयएमचे चार सदस्य..

महापालिकेत 33 नगरसेवकांसह दुसऱ्या क्रमांकाचा आणि विरोधी पक्ष ठरलेल्या एमआयएम पक्षाच्या वाट्याला स्थायी समितीमध्ये चार जागा आल्या आहेत. यावर पक्षाने खान अब्दुल मतिन, मेराज खान, पठाण मझहर, खान अल्मश या चार सदस्यांना संधी दिली.

Newly appointed members of the Standing Committee at Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation after the selection process led by Mayor Sameer Rajurkar amid political tussle among BJP, Shiv Sena and AIMIM.
Congress News : काँग्रेसचा गटनेताच फुटला!जालना महापालिकेत नाचक्की; एक स्वीकृत सदस्य करण्याची संधीही हुकली!

एकीकडे स्थायी समितीवर संधी तर दुसरीकडे शहागंज येथील अतिक्रमण हटाव मोहिमेत हस्तक्षेप करत बाधा आणल्यामुळे सदस्यत्व रद्द करण्याच्या कारवाई संदर्भातील नोटीस आणि पोलीसांत दाखल गुन्ह्यामुळे एमआयएमच्या गोटात चिंतेचे वातावरण पहायला मिळाले.

Newly appointed members of the Standing Committee at Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation after the selection process led by Mayor Sameer Rajurkar amid political tussle among BJP, Shiv Sena and AIMIM.
Municipal Corporation News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत स्थायी समितीवर कोणाची वर्णी? वंचितला मोठी संधी...

या शिवाय महिला व बालकल्याण, शहर सुधार, शिक्षण, आरोग्य, समाज कल्याण या पाच समित्यांसाठी प्रत्येकी 9 सदस्य निवडले. प्रत्येक समितीसाठी भाजप 4, एमआयएम 3, शिंदेसेना 1, उद्धवसेना 1 या प्रमाणे 9 सदस्य निवडले गेले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com