Sameer Wankhede & Ramdas Athawale Sarkarnama
मुंबई

समीर वानखेडेंच्या बचावासाठी रामदास आठवले उतरले मैदानात..

समीर वानखेडे (Sameer Wankhede ) यांच्या केसालाही धक्का लागला तर याद राखा असा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी दिला आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : समीर वानखेडे (Sameer Wankhede ) यांच्यावर नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केलेले आरोप अत्यंत चुकीचे आणि पूर्वग्रह दूषित खोडसाळ आहेत. मलिक आमचे मित्र आहेत पण तरीही त्यांनी वानखेडे यांच्या बाबतीत घेतलेली भूमिका ही चुकीची आहे. वानखेडे यांचे चारित्र्यहीन करण्याचे काम त्यांनी थांबावावे आणि जातीय व धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करु नये. त्यांच्या जीवितास धोका होऊ नये. त्यांना राज्य सरकारने संरक्षण द्यावे. वानखेडे या कर्तबगार अधिकाऱ्याच्या केसालाही धक्का लागला तर याद राखा असा इशाराही रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय (RPI) अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज (ता.24 ऑक्टोबर) दिला. ते मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

आठवले म्हणाले, आर्यन खान विरुद्ध सबळ पुरावे मिळाले, त्यामुळे न्यायालयात अद्याप जामीन मिळाला नाही. कारवाई करताना पुरावे नसते तर, न्यायालयाने तात्काळ आर्यन खानला (Aryan Khan) जामीन दिला असता. वानखेडे यांनी केलेली कारवाई योग्य असून त्यांनी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. ड्रग्सच्या विळख्यातून युवा पिढीला वाचविण्याचे काम नारकोटिक्स विभाग (NCB) करीत आहे. तेच काम ते करीत आहेत. युवा पिढीला ड्रग्सच्या विळख्यातून वाचविण्याचे काम देशहिताचे असून असे चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्रास देणे योग्य नसून उलट आशा अधिकाऱ्यांच्या समर्थनासाठी पुढे आले पाहिजे. वानखेडे यांच्या केसालाही धक्का लागला तर रिपब्लिकन पक्ष रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा आठवले यांनी यावेळी दिला.

वानखेडे हे (IRS) नार्कोटिकस कंट्रोल ब्युरो (NCB) या सेलचे प्रमुख अधिकारी आहेत. आत्तापर्यंत त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक झाले आहे. मात्र, मंत्री मलिक यांच्या जावयावर यापूर्वी त्यांनी कारवाई केली असल्यामुळे त्याचा राग मनात धरून वानखेडे यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी व मलिक यांनी केला आहे. त्यासाठी सत्तेचा गैरवापर केला जात आहे.

आठवले म्हणाले, अशा प्रकारचा एखादा गंभीर निर्णय घेणे हा त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांसोबत घेतलेली सामूहिक प्रक्रिया आहे. त्या निर्णयासाठी फक्त वानखेडे यांना जबाबदार धरणे चुकीचे आहे. मलिक यांच्या जावयावर झालेली कारवाई हा त्यांच्या कर्तव्याचा भाग होता. मलिक यांच्या भूमिकेमुळे तणाव वाढत आहे आणि जाणीवपूर्वक मलिक या प्रश्नाला धार्मिक रंग देत आहेत. वानखेडे यांच्यावर अशा प्रकारचे आघात होणार असतील तर, आम्ही वानखडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असेही आठवले यांनी यावेळी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT