Raj Thackeray,Ramdas Athawale
Raj Thackeray,Ramdas Athawale sarkarnama
मुंबई

सभेला गर्दी होते,पण मते मिळत नाही ; आठवलेंनी राज ठाकरेंना डिवचलं

सरकारनामा ब्युरो

सातारा : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी कालच्या सभेत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला. गेल्या काही दिवसापूर्वी मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत मनसे-भाजप युतीची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मनसेवर टीकेची झोड उठवली आहे, ते सातारा येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

''भाजपचा मनसेला सोबत घेण्याचा निर्णय योग्य होणार नाही. आम्ही भाजपसोबत असल्याने त्यांनी मनसेला सोबत घेऊ नये. आर.पी.आय. बरोबर असताना भाजपला मनसेची काय गरज,'' असा सवाल आठवले यांनी यावेळी उपस्थित केला.

''मनसेच्या सभेला गर्दी होत असली, तरी मते मात्र मिळत नाहीत. सुरुवातीला निवडणुकीत 13 जागा मिळवणारा मनसे पक्ष आता मागे पडत आहेत. आता जरी मनसेने हिंदुत्ववादी मुद्दा घेतला असला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही, मनसेची एक जागा निवडून आलेली आहे,'' असा टोला रामदास आठवले यांनी लगावला.

राज ठाकरे यांनी या सभेत तुफान फटकेबाजी करीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्नधान्यपुरवठामंत्री छगन भुजबळ, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आदींवर राज ठाकरेंनी टीका केली. कालच्या भाषणात राज ठाकरेंच्या रडारवर महाविकास आघाडी सरकारच होतं.

राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे दोन प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्या दोन मागण्या आहेत त्या म्हणजे या देशात समान नागरी कायदा आणा ही एक मागणी. तर देशातल्या लोकसंख्येवर नियंत्रण आणा या दोन प्रमुख मागण्या राज ठाकरे यांनी केल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात आज उत्तर सभा घेतली या उत्तर सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

'3 तारखेपर्यंत ऐकलं नाही तर देशामध्ये जिथे-जिथे मशिदी असतील जिथे बांग सुरु असेल तिकडे हनुमान चालीसा हे लागलंच पाहिजे अख्ख्या देशभर लागलं पाहिजे. यानंतर माझ्यासह आम्ही सगळे अंगावर केसेस घेण्यासाठी तयार आहोत' असं म्हणत राज ठाकरेंनी महाविकास आघाडीला एक प्रकारे इशाराच दिला आहे.

मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा काढणाऱ्या राज ठाकरेंवर शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut)टीका केली होती. 'शिवाजी पार्कात भाजपचे भोंगे वाजत होते,' असं म्हणणाऱ्या संजय राऊतांना राज ठाकरेंनी काल पुन्हा डिवचलं. प्रबोधनकार ठाकरेंचा दाखला देत राज ठाकरेंनी राऊतांचा उल्लेख लवंडे असा केला आहे. त्याला राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय राऊतांनी एका ओळीचं टि्वट करीत राज ठाकरेंना उत्तर दिलं आहे. ''दिवा विझताना मोठा होतो! हे आज पुन्हा दिसले! जय महाराष्ट्र,'' असे म्हणत राऊतांनी एका अर्थानं 'मनसे हा संपत चाललेला पक्ष आहे,' असे पुन्हा सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT