Mumbai News, 05 Oct : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलताना शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर त्यांचा मृतदेह हातांचे ठसे घेण्यासाठी दोन दिवस तसाच ठेवल्याचा गंभीर आरोप केला.
त्यांच्या या आरोपामुळे ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. कदमांवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून सडकून टीका केली जात आहे. अशातच आता ठाकरेसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी थेट कमद एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्यासाठी असं वक्तव्य केल्याचा मोठा दावा केला आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या, 'रामदास कदमांना मानसिक उपचारांची गरज आहे. कारण ते फर्स्टेट झालेत. त्यांना सतत वाटतं की एकनाथ शिंदे त्यांच्या पाठिशी नाहीत. कोकणात उदय सामंतांचं प्रस्थ वाढतंय मात्र दुसरीकडे कदमांचं दमन होतंय. त्यामुळे आपल्या मुलाचं काय होणार?
असं त्यांना वाटतंय कारण त्यांच्या मुलाच्या बारवर रेड पडली ती रेड एकनाथ शिंदे थांबवू शकले नसते का?' असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला. तसंच 'एकनाथ शिंदे आणि अमित शहांचं खूप जुळतं हे सगळ्यांना माहिती आहे.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यामागेही शहाच होते. त्यामुळे योगेश कदमांच्या बारवर रेड पडण्याआधी शिंदे हे अमित शहांना फोन करुन ती रेड उडवू शकले नसते का? पण शिंदेंनी ती रेड अडवली नाही. माझा नेता उपमुख्यमंत्री आणि शहांच्या जवळचा असूनही योगेश कदमांच्या बारवर रेड पडते आहे ही नामुष्कीची गोष्ट आहे.
त्यामुळे मी एकनाथ शिंदेंना अडचणीत आणलं पाहिजे असं रामदास कदमांना वाटतं. शिवाय कदम आता जे काही बोलत आहेत. त्याची भरपाई शिंदेंना करावी लागेल. या सगळ्यामुळे एकनाथ शिंदेंचं नुकसान होईल', असा दावाही अंधारे यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.