Aditya Thackeray & Ramdas Kadam Latest News Sarkarnama
मुंबई

आदित्य यांनी आम्हाला राजकारण शिकवू नये; बाळासाहेबांच्या पाठीत कुणी खंजीर खुपसला?

Aditya Thackeray|Ramdas Kadam : आदित्य ठाकरेंच जितक वय नाही त्यापेक्षा जास्त मी राजकारणात आहे.

सरकारनामा ब्यूरो

Ramdas Kadam : बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) पाठीत कुणी खंजीर खुपसला हे मी लवकरच बोलणार असून त्यांच्या विचारांशी प्रतारणा कुणी केली हेही सांगणार आहे. आदित्य ठाकरेंच (Aditya Thackeray) जितक वय नाही त्यापेक्षा जास्त राजकारणात 52 वर्षे आमची झाली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून राजकारण शिकण्याची आम्हाला गरज नाही, अशी तिखट प्रतिक्रिया शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी दिली आहे. त्यांनी आज (ता.22 जुलै) माध्यमांशी संवाद साधला. (Aditya Thackeray & Ramdas Kadam Latest News)

रामदास कदम यांनी आज आपले सुपुत्र दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्यासह मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी सवांद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेसह आदित्य ठाकरेंच्या टीकेला जोरदार प्रत्यत्तर दिले.

ते म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी आमचं कौटुंबिक नात आहे. त्यामुळे आजच्या भेटीत सर्व कौटुंबिक चर्चा झाली असून कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. पण मी आता पुन्हा महाराष्ट्रात फिरणार असून बाळासाहेबांचे विचार राज्यभर पोचवणार आहे, असे ते म्हणाले. शिवाय शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या सुरक्षेबाबत केलेल्या टीकेबाबतही त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, शिंदेंना सुरक्षा देतेवेळी काय घडल होत याबाबत आरोप करण्याची काही आवश्यकताच नाही. काय घडलं याबाबत शंभूराजे देसाईंनी स्पष्टच सांगितलं आहे. त्यांना सुरक्षा न देण्यासाठी कुणी सकाळी आठ वाजता फोन केला. सुरक्षा देण्यामागे काय हेतू होता. शंभूराजेंनाच विचारा तेच चांगल्याप्रकारे सांगू शकतील, अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

आदित्य ठाकरेंनी नाशिकमध्ये टीका केली की आम्ही त्यांना शिवसैनिक म्हणून मिठी मारली मात्र त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला, असा प्रश्न माध्यम प्रतिनिधीने कदमांना विचारला यावर बोलतांना कदम म्हणाले की, बाळासाहेबांच्या पाठीत कुणी खंजीर खुपसला हे मी लवकरच बोलणार असून त्यांच्या विचारांशी प्रतारणा कुणी केली हेही सांगणार आहे. आदित्य ठाकरेंच जितक वय नाही त्यापेक्षा जास्त राजकारणात 52 वर्षे आमची झाली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून राजकारण शिकण्याची आम्हाला गरज नाही, अशी खोचक टीका त्यांनी आदित्य ठाकरेंवर केली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटात गेलेले नेते आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगत आहे. यामध्ये रामदास कदम यांची पक्षातून हकालपट्टी केल्यावर त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका करत आहेत त्यातही आदित्य ठाकरेंना त्यांनी आपलं लक्ष केलेलं दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT